दीक्षान्त समारंभाचे नवे प्रमुख पाहुणे संजय धांडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दीक्षान्त समारंभाचे नवे प्रमुख पाहुणे संजय धांडे
दीक्षान्त समारंभाचे नवे प्रमुख पाहुणे संजय धांडे

दीक्षान्त समारंभाचे नवे प्रमुख पाहुणे संजय धांडे

sakal_logo
By

विद्यापीठ लोगो
---

फोटो- 91022
-

संजय धांडे नवे प्रमुख पाहुणे
दीक्षान्त समारंभ; शिवाजी विद्यापीठाचे स्वीकारले निमंत्रण

कोल्हापूर, ता. २३ ः शिवाजी विद्यापीठाचा ५९ वा दीक्षांत समारंभ २९ मार्चला घेण्यास राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्याकडून मान्यता मिळाली. आता या समारंभासाठी आयआयटी कानपूरचे माजी संचालक आणि पद्मश्री संजय धांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. त्यांनी उपस्थितीबाबत विद्यापीठाला होकार कळविल्याने समारंभाच्या तयारीने वेग घेतला आहे.
विद्यापीठाने १६ फेब्रुवारीला दीक्षान्त समारंभ घेण्याचे निश्‍चित केले होते. त्यासाठी इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशनचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे हे प्रमुख पाहुणे म्हणून ठरले. मात्र, तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी अचानकपणे त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. त्यावर विद्यापीठ प्रशासनाने काही अपरिहार्य कारणास्तव दीक्षांत समारंभ स्थगित करण्याचा निर्णय १३ फेब्रुवारीला जाहीर केला. त्यानंतर दीक्षांत समारंभ २९ मार्चला घेण्यास राज्यपाल बैस यांनी मान्यता दिली. त्याबाबत डॉ. सहस्त्रबुद्धे यांना विद्यापीठ प्रशासनाने कळविले. मात्र, पूर्वनियोजित इतर कार्यक्रमामुळे त्यांना या दीक्षान्त समारंभाला उपस्थित राहता येणार नाही. त्याबाबत त्यांनी विद्यापीठ प्रशासनाला कळविले. त्यानंतर प्रशासनाने नवे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याबाबत पद्मश्री धांडे यांना निमंत्रण दिले. त्यांनी होकार दिला आहे. नावीन्यपूर्ण तंत्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक म्हणून ते परिचित आहेत. त्यांनी पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार परिषदेचे सदस्य, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे सदस्य म्हणून काम केले आहे. पुणे आणि कोलकाता येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स फॉर एज्युकेशन अँड रिसर्चसाठी व्हिजन डॉक्युमेंटची निर्मिती करण्यात त्यांनी योगदान दिले आहे. त्यांनी कॉम्प्युटर एडेड डिझाईन, रॅपिड प्रोटोटाइपिंग, रॅपिड टूलिंग आणि रिव्हर्स इंजिनीअरिंग या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. उज्जैन येथील अवंतिका विद्यापीठाच्या कुलपतीपदी ते सध्या कार्यरत आहेत.