
जिव्हाजी बँकेची जवाहरनगर शाखा सुरू
ich241.jpg
91030
इचलकरंजी ः जिव्हाजी बँकेच्या जवाहरनगर शाखेचे उद्घाटन आमदार प्रकाश आवाडे यांच्याहस्ते झाले. यावेळी बँकेचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिव्हाजी बँकेची जवाहरनगर शाखा सुरू
इचलकरंजी, ता. २४ ः येथील जिव्हाजी सहकारी बँकेच्या जवाहरनगर शाखेचे उद्घाटन आमदार प्रकाश आवाडे यांच्याहस्ते झाले. यानिमित्त बँकेने आकर्षक ठेव योजना जाहीर केली होती. त्याला पहिल्याच दिवशी ठेवीदारांनी प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात ठेवी जमा केल्या.
बँकेच्या प्रगतीबद्दल आमदार आवाडे यांनी समाधान व्यक्त करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. माजी उपनगराध्यक्षा किशोरी आवाडे, स्वकुळ साळी समाजाचे अध्यक्ष सुभाष बेलेकर, दिलीप घट्टे, बँकेच्या माजी अध्यक्षा अंजली बावणे, समाजाचे अध्यक्ष रमेश कनोजे, विश्वनाथ मुसळे आदी मान्यवर उपस्थीत होते. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देवून शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष मांगलेकर, उपाध्यक्ष श्रीकृष्ण खामकर, संचालक रविंद्र पाटील, प्रशांत बडवे, शंकर बडक्यागोळ, राहूल खामकर, आदेश काजवे, प्रशांत डांगरे, रमेश कार्वेकर, संजय जिंदे, प्रतिक्षा डांगरे, माधुरी सदलगे यांनी स्वागत करुन शुभेच्छा स्वीकारल्या. स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष आनंद मांगलेकर यांनी केले. बँकेच्यावतीने सुरु असलेल्या विविध सुविधांचा आढावा घेवून त्याचा लाभ ग्राहकांनी घेण्याबाबत आवाहन केले.