jsp241_txt.txt

jsp241_txt.txt

91051
संभाजीपूरः शुक्रवारी गावात कडकडीत बंद पाळण्यात आला.

संभाजीपूरला कडकडीत बंद
जयसिंगपूर, ता.२४ः शिरोळमधील सोशल मिडीयावरील आक्षेपार्ह पोस्टच्या निषेधार्थ संभाजीपूर (ता.शिरोळ) येथे गाव बंद पाळण्यात आले. गुरुवारी गावातील तरुणांनी बंदचा निर्णय घेऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून गावातील व्यापारी आणि ग्रामस्थांना बंदची कल्पना दिली. शुक्रवारी सकाळपासून गावातील व्यवहार पूर्णपणे उत्स्फुर्तपणे बंद ठेवण्यात आले. बंदची माहिती शिरोळ आणि जयसिंपूर पोलिसांना देण्यात आली. त्यामुळे दोन्ही पोलिस ठाण्याच्यावतीने गावात बंदोबस्त ठेवण्यात आला. सायंकाळनंतर गावातील व्यवहार पूर्वपदावर आले. माजी ग्रामपंचायतीचे सदस्य विशाल पवार, प्रसन्न देसाई, विनोद पाटोळे, रवी धोत्रे, संग्राम दळवी, संभाजी कोळी, मनोज खामकर, केतन पाटील, जोसेफ सरवदे, शंकर माळी, समीर कलावंत, अतुल कुंभार, शांतीनाथ पाटील आदींनी बंद शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com