कौशल्य विकास अभ्यासक्रम

कौशल्य विकास अभ्यासक्रम

सुट्टीत काय करायचे? आहेत ना हे कोर्स..!
आयटीआयमध्ये पर्याय; तीन-चार महिन्यांसाठीचे अभ्यासक्रमांचे प्रवेश खुले
नंदिनी नरेवाडी : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ : तीन महिन्यांच्या उन्हाळाच्या सुट्टीत काय करायचे?, असा प्रश्‍न बहुंताश विद्यार्थ्यांना पडतो. तर आयटीआयतर्फे स्किल इंडिया प्रोग्रॅम अंतर्गत व्यावसायिक प्रशिक्षण देणारे अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. याची प्रवेश प्रक्रिया सुरू असून सुट्टीच्या कालावधीचा विनियोग करण्याची नामी संधी यानिमित्ताने विद्यार्थ्यांना मिळणार आहे. पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक जगात कौशल्यावर आधारित शिक्षण देण्याचा हा प्रयोग यशस्वीही होत आहे. विशेष म्हणजे यातील सर्वच अभ्यासक्रम मोफत आहेत.
महाविद्यालयीन तरूणाई सुट्ट्यांचा आनंद नेहमीच लुटत असते. मात्र व्यावसायिक अभ्यासक्रम शिकण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी समोर आली आहे. परीक्षा संपल्यानंतर या अभ्यासक्रमांचे दार सुट्टीत उघडले जाणार आहे. व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना भविष्यात स्वतःच्या पायावर उभा करण्यास मदत करतो. याचेच भान राखून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने अंतर्गत हे अल्पमुदतीचे रोजगारक्षम व्यवसाय अभ्यासक्रम सुरू केले आहेत. दहावी उत्तीर्ण कोणतीही व्यक्ती या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ शकतो. या अभ्यासक्रमांसाठी रविवार (ता. २६) पर्यंत प्रवेश अर्ज भरण्याची मुदत असून यातील बहुंताश अभ्यासक्रमांचे प्रवेश फुल्ल झाले आहेत. या अभ्यासक्रमांच्या अधिक माहितीसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), कळंबा येथे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
------
कोट
दरवर्षी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे अल्पमुदतीचे रोजगारक्षम व्यवसाय अभ्यासक्रम घेतले जातात. यातून विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित केले जातात. दरवर्षी या अभ्यासक्रमांना मोठा प्रतिसाद मिळतो. यंदाही काही अभ्यासक्रमांच्या सर्वच जागा भरल्या गेल्या आहेत.
- अनिल शिंदे, गटनिदेशक, आयटीआय
--------------
हे आहेत अभ्यासक्रम
अभ्यासक्रम*कालावधी*वेळ
फिल्ड टेक्निशियन - एअर कंडिशनर*३९० तास*सकाळी साडेआठ ते दुपारी साडे बारा
सी. एन. सी ऑपरेटर (टर्निंग)*५१० तास*दुपारी दोन ते सायंकाळी सहा
सी. एन. सी ऑपरेटर (व्हर्टिकल मशिनिंग सेंटर)*५१० तास*दुपारी दोन ते सायंकाळी सहा
ब्युटी थेरपिस्ट (मुलींसाठी)*३९० तास*दुपारी दोन सायंकाळी पाच
असिस्टंट प्लंबर जनरल*३९० तास*सकाळी ८.४० ते ११.४०
वेल्डर (गॅस टंगस्टन आणि आर्कवेल्डिंग)*३९० तास*सकाळी अकरा ते दुपारी दोन
असिस्टंट इलेक्ट्रिशियन*३९० तास*दुपारी दोन ते सायंकाळी पाच
ड्रॉफ्ट्समन मेकॅनिकल*३९० तास*सकाळी नऊ ते दुपारी बारा
फोर व्हिलर सर्व्हिस टेक्निशियन*३९० तास*दुपारी दोन ते सायंकाळी पाच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com