
आजरा ः सत्कार बातमी
ajr243.jpg....
91140
आजरा ः येथे संग्रामसिंह कुपेकर यांचा सत्कार करतांना तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार. यावेळी अरुण देसाई, दिगंबर देसाई, मलिककुमार बुरुड, संतोष बेलवाडे, संतोष चाैगुले व मान्यवर
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
आजरा भाजप कार्यालयात
संग्रामसिंह कुपेकर यांचा सत्कार
आजरा ः येथील आजरा तालुका भाजप कार्यालयात भाजपमध्ये प्रवेश केलेले जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती संग्रामसिंह कुपेकर यांचा सत्कार झाला. भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार यांनी सत्कार करून स्वागत केले. श्री. कुपेकर म्हणाले, ‘भाजप पक्षात काम करण्यासाठी चांगली संधी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करणार आहे.’ तालुकाध्यक्ष श्री. कुंभार म्हणाले, ‘भाजपवर जनतेचा विश्वास तयार झाला आहे. कुपेकर यांच्या पक्षप्रवेशाने पक्ष बळकट होण्यास मदत होईल.’ यावेळी माजी तालुकाध्यक्ष अरुण देसाई, आजरा कारखाना संचालक दिगंबर देसाई, मलिककुमार बुरुड, संतोष बेलवाडे, संतोष चाैगुले, नाथ देसाई, श्री. मटकर उपस्थित होते.