बॅडमिंटन स्पर्धेत शिवराज फार्मसीचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बॅडमिंटन स्पर्धेत शिवराज फार्मसीचे यश
बॅडमिंटन स्पर्धेत शिवराज फार्मसीचे यश

बॅडमिंटन स्पर्धेत शिवराज फार्मसीचे यश

sakal_logo
By

बॅडमिंटन स्पर्धेत शिवराज फार्मसीचे यश
गडहिंग्लज : सांगली कोल्हापूर व सातारा स्पोर्टस आणि अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ फार्मसीच्यावतीने झालेल्या बॅडमिंटन स्पर्धेत शिवराज कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली. मुलींच्या एकेरी सामन्यात पूर्वा मिसाळ विजेती ठरली. मुलांच्या एकेरी सामन्यात संकेत मगदूम रनरअप तर मुलांच्या दुहेरी सामन्यात संकेत मगदूम व राजभूषण पाटील विजयी ठरले. यशाबद्दल विद्यासंकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव डॉ. अनिल कुराडे, अ‍ॅड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले. प्रा. प्रणव सावेकर यांचे मार्गदर्शन मिळाले.
----------------------------------------------
‘ओंकार’मध्ये वक्तृत्व, वादविवाद स्पर्धा
गडहिंग्लज : येथील ओंकार महाविद्यालय व राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालयात शहीद दिन व वार्षिक स्नेहसंमेलन झाले. इतिहास व इंग्रजी विभागातर्फे वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा झाल्या. शहीद भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांच्या जीवनावरील भित्तीपत्रिकेचे उद्‍घाटन संस्था संचालक उद्धव इंगवले यांच्याहस्ते तर स्पर्धेचे उद्‍घाटन आदेश नाईक यांच्याहस्ते झाले. प्रा. संगीता पाटील यांनी वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेविषयी मार्गदर्शन केले. सरोज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्र. प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण यांचे भाषण झाले. संस्थाध्यक्ष राजन पेडणेकर यांचे प्रोत्साहन मिळाले. प्रा. गजानन कुलकर्णी यांनी स्वागत केले. प्रा. स्वयंप्रभा सरमगदूम यांनी प्रास्ताविक केले. कोमल बिरंबोळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. प्रशांत कांबळे यांनी आभार मानले.
---------------------------------------------
‘घाळी’मध्ये राष्ट्रीय लसीकरण दिन
गडहिंग्लज : डॉ. घाळी महाविद्यालयातील मायक्रोबायोलॉजी विभागातर्फे राष्ट्रीय लसीकरण दिन साजरा केला. लस सर्वांसाठी कार्य करते या २०२३ च्या थीमवर विद्यार्थ्यांसाठी पॉवर पॉईट सादरीकरण स्पर्धा झाली. प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांच्याहस्ते उद्‍घाटन झाले. विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव सचिव गजेंद्र बंदी अध्यक्षस्थानी होते. स्पर्धेत लक्ष्मीकांत वरदापगोळ, साक्षी बागडी, सुप्रिया चौगुले यांच्या संघाने यश मिळवले. विभागप्रमुख प्रा. महेश कदम यांनी स्वागत केले. प्रा. प्राजक्ता कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विद्या सोनाळकर यांनी आभार मानले. प्रा. वैष्णवी सुतार, प्रा. तेजश्री कानकेकर, प्रा. मृणाल जाधव, प्रा. निकिता भोईटे, प्रा. सिया हिडदुग्गी, प्रा. तेजस्विनी वागवेकर आदी उपस्थित होते.