हारूर येथे गटार बांधकामाचा प्रारंभ

हारूर येथे गटार बांधकामाचा प्रारंभ

ajr244.jpg
91134
हारुर (ता. आजरा) ः येथे विविध विकासकामांचा प्रारंभ कुदळ मारून कानोलीच्या सरपंच सुषमा पाटील यांनी केला. स्वप्नील आरदाळकर आदी उपस्थित होते.
-----------
हारूर येथे गटार बांधकामाचा प्रारंभ
भादवण, ता. २६ ः ग्रुप ग्रामपंचायत कानोली पैकी हारूर या गावी ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगातून सार्वजनिक गटार कामाला सुरवात झाली आहे. सरपंच सुषमा पाटील यांच्याहस्ते कुदळ मारून कामाचा प्रारंभ झाला. सरपंच सौ. पाटील म्हणाल्या, ‘कानोली व हारूर या दोन्ही गावांच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. विकासकामांबरोबरच ग्रामस्थांना व्यक्तीगत लाभ मिळवून देण्यासाठी शासन पातळीवर पाठपुरावा करणार आहे. गावच्या विकासकामात कोठेही कमी पडणार नाही.’ स्वागत व प्रास्ताविक सुनील पालकर यांनी केले. प्रमुख मान्यरांचा सत्कार केला. उपसरपंच स्वप्निल अर्दळकर, सदस्य चंद्रकांत पाटील, अनिल पाटील, सारिका भोसले, शुभांगी पाटील, आरती देसाई, दिपाली सुतार, माया लोहार, ग्रामसेवक शिवाजी दुडगेकर, मनोहर सावरतकर, चंद्रकांत आपगे, बाजीराव पाटील आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com