जाहिरात बातमी

जाहिरात बातमी

‘टाटा तनिष्क’तर्फे
मंगळसूत्र महोत्सव
कोल्हापूर, ता. २४ : ‘टाटा तनिष्क’तर्फे खास लग्नसराईसाठी मंगळसूत्र महोत्सवाचे आयोजन केले आहे. ‘टाटा तनिष्क’ने दागिन्यांच्या क्षेत्रात विविध प्रकारचे, कलाकुसरीचे नाविन्यपूर्ण कलाकुसरीचे दागिने आणले आहेत. त्यामुळे लग्नसराई दरम्यान टाटा तनिष्कच्या दागिन्यांचे नाव प्राधान्याने घेतले जाते. लग्नसराईत प्रथम मान दिला जातो तो मंगळसुत्रास, त्यामुळे तनिष्कने मंगळसुत्र महोत्सवाचे आयोजन केले आहे.
यामध्ये मंगळसुत्राचे एक हजारहून अधिक प्रकार उपलब्ध असून १६ इंचापासून ते ३४ इंचापर्यंतचे असंख्य प्रकारचे मंगळसुत्र पहावयास मिळणार आहेत. १४ कॅरेटमधील मिया कलेक्शनमध्ये कमी वजनाचे सुंदर असे व कमीत कमी ३० हजार पासुनचे मंगळसूत्र उपलब्ध आहेत; तसेच २२ कॅरेट सोन्यामध्येही १६ इंचापासून ३४ इंचापर्यंतचे असंख्य मंगळसुत्र ‘टाटा तनिष्कमध्ये पहावयास मिळतील. कमीत कमी सात ग्रॅमपासून ते १०० ग्रॅमपर्यंतचे अत्यंत मनमोहक कलाकुसरीचे असंख्य मंगळसुत्र नववधुच्या पसंतीस पडतील, अशीच आहेत. फिलीग्री वर्क, फ्युजन वर्क, रवा वर्क, कुंदन वर्क, मिना वर्क अशा विविध कलाकुसरीच्या मंगळसुत्रांची मालिका ‘टाटा तनिष्क’मध्ये पहावयास मिळेल. तसेच हिरेजडीत मंगळसुत्रांचे असंख्य प्रकार ‘टाटा तनिष्क’मध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये १८ इंचापासून ३४ इंचापर्यंत आणि ४० हजारांपासून ते सहा लाखांपर्यंतची मंगळसुत्रे आहेत. यासाठी तनिष्क, दसरा चौक, कोल्हापूर व तनिष्क, एस. एफ. सी. मेगा मॉल, सांगली येथे भेट देण्याचे आवाहन प्रसाद कामत यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com