भाजप विरोधी पक्षांची निदर्शने

भाजप विरोधी पक्षांची निदर्शने

gad245.jpg
91209
गडहिंग्लज : राहूल गांधी यांना खासदार म्हणून अपात्र ठरविल्याच्या निषेधार्थ दसरा चौकात आंदोलन करताना भाजपविरोधी पक्षांचे पदाधिकारी.
-----------------------------
भाजप विरोधी पक्षांची निदर्शने
गडहिंग्लजला आंदोलन : राहूल गांधींना खासदार म्हणून अपात्र ठरविल्याचा निषेध
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २४ : काँग्रेस नेते राहूल गांधी यांना खासदार म्हणून अपात्र ठरवल्याच्या निषेधार्थ भाजप विरोधी पक्षांनी एकत्र येत आंदोलन केले. येथील दसरा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली. भाजपचा तीव्र शब्दात निषेध करतानाच राहूल गांधी यांच्या पाठिशी ठामपणे उभा राहण्याचा निर्धार केला.
काँग्रेस नेते राहूल गांधी यांना मानहाणीच्या प्रकरणात सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे आज त्यांना खासदार म्हणून अपात्र ठरवले. या निर्णयाच्या निषेधार्थ भाजप विरोधात असणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), वंचित बहुजन आघाडी या पक्षांचे कार्यकर्ते सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दसरा चौकात एकत्र आले. नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी..., भाजप सरकारचे करायचे काय... आदी घोषणा दिल्या.
माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे म्हणाले, ‘राहूल गांधी यांच्याबाबत दिलेला निकाल एकतर्फी आहे. त्यांना अपील करण्यासाठी वेळ दिला पाहिजे होता. देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे सुरु आहे. भाजपविरोधात बोलणाऱ्या लोकांवर कारवाई केली जात आहे. पण, सरकार आदानीबाबत काही बोलत नाही.’ काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत देसाई, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिलीप माने, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष रामगोंड उर्फ गुंडू पाटील, जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, वंचितचे सुरेश थरकार, डी. जी. चिघळीकर, अॅड. दिग्विजय कुराडे यांचीही भाषणे झाली.
काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विद्याधर गुरबे, माजी सभापती विजय पाटील, माजी नगराध्यक्ष बापू म्हेत्री, माजी नगरसेवक हरुण सय्यद, राजशेखर येरटे, अजिंक्य चव्हाण, रमजान अत्तार, वसंत नाईक, राजेश पाटील-औरनाळकर, अजित बंदी, महेश तुरंबतमठ, महेश सलवादे, रावसाहेब पाटील, सुभाष निकम, तानाजी कुराडे, तानाजी चौगुले आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com