
देवर्डे शाळेत योगा शिबिर सुरू
91224
देवर्डे (ता. आजरा) : येथील प्राथमिक शाळेच्या पटांगणावर योगाची प्रात्यक्षिक सादर करताना विद्यार्थी.
देवर्डे शाळेत योगा शिबिर सुरू
आजरा : देवर्डे (ता. आजरा) येथील प्राथमिक शाळेमध्ये सलग सोळाव्या वर्षी योगा शिबिराची सुरुवात झाली. हे शिबीर पंधरा दिवस चालेल. २००८ पासून सुरु असलेला हा उपक्रम शाळेत अखंडितपणे उत्साहात सुरू आहे. दर वर्षी पहिली ते नववीचे सुमारे २१०-२३० विद्यार्थी-विद्यार्थिनी शिबीरात सहभागी होतात. या वर्षी शिबिरामध्ये गायत्री मंत्र व ओमकारासह अनुलोम-विलोम, भद्रीका, कपालभाती, भ्रामरी हे प्राणायाम यासह विविध योगासने प्रात्यक्षिके दाखवून विद्यार्थ्यांकडून करवून घेतली जात आहेत. या उपक्रमाचे नियोजन सुनिल सुतार यांनी केले आहे. मुख्याध्यापक नामदेव माईनकर यांच्यासह संयोगिता सुतार, सरोजिनी कुंभार, रेश्मा बोलके, महादेव तेजम, वंदना चव्हाण या शिक्षकांचे सहकार्य लाभत आहे.