बारावीच्या परीक्षेत यंदा तीन ‘कॉपी’ केसेस

बारावीच्या परीक्षेत यंदा तीन ‘कॉपी’ केसेस

बारावीच्या परीक्षेत यंदा ‘कॉपी’चे तीन प्रकार

कोल्हापूर विभागात गैरप्रकाराला आळा; दहावीला एकही प्रकार नाही

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ ः प्रत्येक केंद्रावर बैठे पथक, भरारी पथक, आदींच्या माध्यमातून कोल्हापूर विभागात दहावी, बारावीच्या परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी झाली. त्यामुळे यावर्षी बारावीच्या परीक्षेत तीन कॉपीचे प्रकार घडले. दहावीच्या परीक्षेत एकही प्रकार घडला नाही. गेल्यावर्षी दहावी, बारावीच्या परीक्षेतील कॉपी केसेसची संख्या २२ होती.
यावर्षी कोल्हापूर विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतून बारावीच्या १ लाख २१ हजार ८७, तर दहावीच्या १ लाख ३० हजार ७६७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियानाची कडक अंमलबजावणी करण्यात आली. तिन्ही जिल्ह्यांतील प्रत्येक परीक्षा केंद्रावर जिल्हा प्रशासनाने बैठी पथके तैनात ठेवली होती. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे प्रत्येक जिल्ह्यासाठी सात अशी एकूण २१ भरारी पथके कार्यन्वित होती. कोल्हापूर जिल्ह्यात शाळानिहाय पर्यवेक्षक बदलले होते. विद्यार्थ्यांना शिक्षा सूचीची माहिती दिली होती. त्यामुळे परीक्षा कालावधीतील गैरप्रकारांना आळा बसल्याचे शिक्षण मंडळाचे कोल्हापूर विभागीय सचिव डी. एस. पोवार यांनी सांगितले. या गैरमार्ग प्रकरणी संबंधित विद्यार्थ्यांना मंडळ कार्यालयात बोलावून चौकशी अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाते. मंडळाच्या शिफारशीनुसार त्या-त्या गैरमार्ग प्रकारानुसार विद्यार्थ्यास शिक्षा केली जाते, असे त्यांनी सांगितले.
..................................
आकडेवारी अशी
-परिरक्षकांची संख्या ः ४५
-दहावी, बारावीची परीक्षा केंद्रे ः ५२५
-एकूण परीक्षार्थी ः २ लाख ५१ हजार ८५४
................................
दहावीचा आज शेवटचा पेपर
दहावीच्या परीक्षेतील शेवटचा भूगोल विषयाचा पेपर उद्या (ता.२५) सकाळी ११ ते दुपारी १.१० या वेळेत होईल. दहावी आणि बारावी परीक्षेतील उत्तरपत्रिका तपासणीचे काम गतीने सुरू असल्याचे पोवार यांनी सांगितले.
................................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com