सराफ सुवर्णकार संघ मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सराफ सुवर्णकार संघ मेळावा
सराफ सुवर्णकार संघ मेळावा

सराफ सुवर्णकार संघ मेळावा

sakal_logo
By

91363
कोल्हापूर : करवीर सराफ व सुवर्णकार संघातर्फे आयोजित मेळाव्यात बोलताना कृष्णात बोरचाटे. या वेळी मान्यवर उपस्थित होते.

कायदे कडक असले तरी सतर्क राहा
कृष्णात बोरचाटे; करवीर सराफ, सुवर्णकार संघातर्फे मेळावा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ : ‘‘एक एप्रिलपासून हॉलमार्क असलेल्या दागिन्यांची विक्री करायची आहेत. यासंबंधित कायदे कडक असले तरी सुवर्णकार व्यापाऱ्यांनी सतर्क राहिले पाहिजे. आपला व्यवसाय टिकून ठेवला पाहिजे,’’ असे आवाहन सीए कृष्णात बोरचाटे यांनी केले.
करवीर सराफ व सुवर्णकार संघातर्फे तोरस्कर चौकातील अभिषेक लॉनमध्ये मेळावा झाला. या वेळी ते बोलत होते. राज्य सराफ व सुवर्णकार फेडरेशनचे उपाध्यक्ष सुरेंद्र पुरवंत अध्यक्षस्थानी होते. ‘हॉलमार्क व एचयुआयडी’ संदर्भात तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. विविध क्षेत्रात यश मिळविलेल्या नामदेव नाळे, सचिन देवरुखकर, अविनाश मुखरे, युवराज बाऊचकर, युवराज पोतदार, सचिन कुंभार, ओंकार जगताप, सुहानी ढणाल, अनिल कदम, रुद्र कुंभार यांचा सत्कार झाला.
बोरचाटे म्हणाले, ‘‘हॉलमार्क नोंदणी सक्तीची आहे. सोन्याची शुद्धता अबाधित ठेवण्याकरीता जे सुवर्णकारागीर आहेत, त्यांच्याशी संवाद साधून शुद्धतेच्या आग्रह धरा. केडियम, इरेडियम, ऑसमियम अशी पावडर सोन्याच्या दागिन्यात चालणार नाही. त्यामुळे हॉलमार्क पास होणार नाही. हॉलमार्कचे जे नियम आहेत, ते पाळून दागिन्यांची विक्री करा. जे व्यापारी ही नोंदणी करणार नाहीत, त्यांना दंड भरावा लागेल. यासाठी हॉलमार्कची नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन आहे. ती सोपी आहे.’’
जिल्हा सराफ व सुवर्णकार संघाचे अध्यक्ष अमोल ढणाल म्हणाले, ‘‘स्पर्धा वाढली असून सर्वसामान्य सराफ आणि सुवर्णकारागिरांना व्यवसाय करणे अवघड झाले आहे. स्पर्धा असली तरी भविष्यकाळातील बदल स्वीकारावे लागतील. ज्येष्ठ तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेऊ या; पण व्यवसायातून बाहेर जाऊ नका. सचोटीने व्यवसाय करा.’’
पुरवंत म्हणाले, ‘‘व्यावसायिक संघटीत राहीला नाही, तर निर्बंध लादले जातील. सोन्याशी संबंधित कायदे कडक होत आहेत. सर्व व्यवहार पारदर्शन ठेवा. जेणेकरुन कोणताही कायदा आला तरी तुमच्या मनात धास्ती राहणार नाही. विश्‍वासार्हता जपा, तुमचा व्यवसाय नक्की वाढेल.’’
हॉलमार्किंग लायसन्स संदर्भात साक्षी पाटील म्हणाल्या, ‘‘जे दागिने असतात, त्याचे कॅरेटस्‌ एकच असले पाहिजे; कारण त्यावरच विश्‍वासार्हता असते. तुमचा व्यवसाय सतत अपडेटस्‌ ठेवा. परवाना काढणे, परवान्याशी संबधित कागदपत्रे जपून ठेवा.’’
करवीर सराफ व सुवर्णकार संघाचे अध्यक्ष मोहन पोतदार यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष रणजित सराटे यांनी आभार मानले. संभाजी नाळे यांनी सुत्रसंचालन केले. सचिव अमोल पडवळ, खजिनदार राजेंद्र पोतदार, संचालक किरण माणगावकर, सुरेश जगताप, प्रमोद खांडके आदींनी नियोजन केले. शहर आणि करवीर तालुक्यातील सराफ, सुवर्णकार उपस्थित होते.
------------------
कोट
कोणताही नियम, कायदे आले तर त्याला विनाकारण विरोध करू नका. बदल स्वीकारायला तयार व्हा. बाहेरील जगामध्ये सोन्याबद्दल काय सुरु आहे, त्याचा प्रत्येकाने अभ्यास करा. नियम जाचक असेल तर कडाडून विरोध करा. ‘चेंबर’तर्फे तुम्हाला नेहमीच सहकार्य राहील.
संजय शेटे, अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स