आवश्‍यक बातमी

आवश्‍यक बातमी

‘होमेसाकॉन’ होमिओपॅथी परिषद आज
कोल्हापूर : पेक्टस होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज एक्स स्टुडंटस असोसिएशनतर्फे (होमेसा) रविवारी (ता. २६) ‘होमेसाकॉन’ परिषद आयोजित केली आहे. खासदार धनंजय महाडीक यांच्या हस्ते सकाळी ९.४५ वाजता होमिओपॅथिक वैद्यकिय महाविद्यालय, ताराराणी चौकच्या सभागृहामध्ये उद्‌घाटन होणार आहे. होमिओपॅथिक औषधोपचारामध्ये नवीन बदल होमिओपॅथसना आत्मसात करणे अपरिहार्य असते. यास्तव परिषदेचे आयोजन दरवर्षी करणेत येते, अशी माहिती ‘होमेसा’ अध्यक्ष डॉ. राजकुमार पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. परिषदेस ऑफलाईन, ऑनलाईन होमिओपॅथस सहभागी होणार असून सहभागांसाठी सचिव डॉ. राजेश कागले, संयोजक सचिव डॉ. सुनेत्रा शिराळे यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन ‘होमेसा’तर्फे करण्यात येत आहे. डॉ. अजित वलवणकर, डॉ. चेतन जोशी, डॉ. महादेव गावडे, डॉ. शितल पाटील, डॉ. हर्षवर्धन जगताप, डॉ. अजय हनमाने आदी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com