काँग्रेस आंदोलन

काँग्रेस आंदोलन

काँग्रेसचे आज सत्याग्रह आंदोलन
कोल्हापूर ः खासदार राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्याच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे उद्या (ता. २६) दिवसभर पापाची तिकटी येथील गांधी पुतळ्यासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे.
सकाळी दहापासून सुरू होणाऱ्या आंदोलनात जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्यासह आमदार जयश्री जाधव, राजू आवळे, ऋतुराज पाटील, प्रा. जयंत आसगावकर, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य उपस्थित राहणार आहेत. या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com