
पोलिसांसमोर वाचला पाढा
पोलिस अधिकाऱ्यांसमोर
वाचला तक्रारींचा पाढा
आयजी, डीएसपींकडून दखल, गुंडा पथक होणार स्थापन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.२५ ः पेठवडगावमध्ये पोलिस कर्मचाऱ्याचे अवैध धंदे आहेत, त्याच्यांवर कारवाई होत नाही. पोलिस ठाण्यात महिलांनाच नव्हे तर तक्रारदाराला हिन वागणूक दिली जाते. कॉलेज परिसरात मुली सुरक्षित नाहीत, सोशल मीडियावरील स्टेटसमुळे दंगली होत आहेत. त्यासाठी संबंधित व्यक्तीला जबाबदार धरा. त्याच्यावर कारवाई करा. त्यामुळे एखाद्या धर्माला, जातीला दोष देवू नका, अशा एकापेक्षा एक तक्रारींचा पाढाच आज संवाद मेळाव्यात नागरिकांनी आणि शांतता समितीच्या सदस्यांनी पोलिस अधिकाऱ्यांसमोर वाचला.
विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या उपस्थितीत आज संवाद मेळवा झाला. यासाठी जिल्ह्यातील ठराविक नागरिकांना, पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले होते. त्यांनीच येथे पोलिसांसमोरच त्यांच्याकडील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून मिळणारी वागणूक जाहीरपणे मांडली. तसेच खुद्द पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडून ताततीडने दखल घेतली जाते. पण, पोलिसांकडून घेतली जात नसल्याचेही असल्याचेही जाहीरपणे सांगण्यात आले. पेठवडगावमधील एका पोलिस कर्मचाऱ्याच्या नावाचा उल्लेख करून त्याचे कारनामे एका व्यक्तीने सांगितले. विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक यांच्यासह निरीक्षकांसमोर ही वस्तूस्थिती मांडली.
-
कोट
गुंडा पथक पुन्हा कार्यरत करणार आहे. गुन्हे शाखा अधिक कार्यक्षम करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्यात तक्रारदाराला पाणी देवून सन्मानाची वागणूक दिली जाईल. धार्मिक आणि महापुरुषांच्या बदनामीचा प्रयत्न केल्यास जात, धर्म, पक्ष, वर्ग न पाहता गुन्हे दाखल केले जातील. प्रसंगी पोलिस यामध्ये फिर्यादी होतील. मात्र, असले प्रकार खपवून घेतले जाणार नाही.
सुनील फुलारी, विशेष पोलिस महानिरीक्षक
-
कोट
सर्व सूचनांची दखल घेतली जाईल. कोणत्याही परिस्थिती अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत. खासगी सावकारी, महिलांविषयी गुन्ह्यांची दखल तातडीने घेतली जाते. मोठी दंगल होऊ दिली जात नाही. तुमच्या सर्वांचे सहकार्य लाभले आहे. आर्थिक गुन्ह्यात कायद्यानुसार जे शक्य आहे त्यानुसार कारवाई केली जात आहे. तरुणांनी सोशल मीडियावर ‘रिॲक्ट’ होताना काळजी घ्यावी. कोणी दोषी आढळल्यास त्यांच्या करिअरचा विचार न करता त्यांच्यावर कारवाई होईल.
शैलेश बलकवडे, पोलिस अधीक्षक