इचल : निवड आवश्यक

इचल : निवड आवश्यक

ich253.jpg
91393
राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी विठ्ठल चोपडे

इचलकरंजी ः राष्ट्रवादी काँग्रेसच्या इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्षपदी माजी नगरसेवक विठ्ठल पुंडलिक चोपडे यांची नियुक्ती झाली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत ही घोषणा करुन निवडीचे पत्र प्रदान केले. यावेळी प्रांतिक सदस्य मदन कारंडे, माजी आमदार राजीव आवळे, नितीन जांभळे, उदयसिंग पाटील, मंगेश कांबुरे, नितीन कोकणे, अमित गाताडे उपस्थित होते. विद्यमान शहराध्यक्ष प्रकाश पाटील यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. इचलकरंजी नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर झाल्याने शहराध्यक्ष पद बरखास्त करुन त्याऐवजी महानगर जिल्हाध्यक्ष असे पद निर्माण झाले आहे. या पदावर कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती. या पदासाठी चोपडे यांच्या एकमेव नावाची चर्चा काही दिवसांपासून होती. चोपडे यांची अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख आहे. आतापर्यंत ते तीनवेळा नगरसेवक पदावर निवडून आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com