एस टी महामंडळास विविध समस्यांबाबत इनामचे निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एस टी महामंडळास विविध समस्यांबाबत इनामचे निवेदन
एस टी महामंडळास विविध समस्यांबाबत इनामचे निवेदन

एस टी महामंडळास विविध समस्यांबाबत इनामचे निवेदन

sakal_logo
By

एस टी महामंडळास विविध समस्यांबाबत इनामचे निवेदन

इचलकरंजी, ता. २६ : इचलकरंजी-कोल्हापूर विना थांबा बसेस सुरू करणे, एस टी बसेसच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे, इचलकरंजी एसटी आगाराराने प्रवासी सोयीसुविधा व महामंडळाच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करावेत. यासह विविध मागण्यांचे निवेदन इचलकरंजी नागरिक मंचच्यावतीने अधीक्षक सुहास चव्हाण यांना दिले.
निवेदनात इचलकरंजी - कोल्हापूर बस फेऱ्या रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवाव्यात, सामान्य प्रवाशांसाठी मुंबई साधी एस टी रोज रात्री सुरू करणे. हातकणंगले रेल्वे स्थानकापासून रेल्वेच्या वेळेत इचलकरंजी बस सुरू करणे, बसस्थानक परिसरातील खड्डे तातडीने बुजवणे आदी नमूद केले आहे. दरम्यान महामंडळ प्रशासनाने विना थांबा बस, कोल्हापूरच्या उशिरा फेऱ्या व मुंबई गाडी लवकरात लवकर सुरू करण्याचे मान्य केले. गाड्या दुरूस्तीसह अन्य मागण्यांबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. इचलकरंजी नागरिक मंचचे राजु कोन्नुर, उमेश पाटील, महेंद्र जाधव, अॅड. एस. बी. सावेकर, जतीन पोतदार, राम आडकी, रसूल जमादार, आप्पासाहेब पाटील, सुहास पाटील, सचिन बाबर आदी उपस्थित होते.