‘कॉफी विथ व्हीसी’तून गुणवंतांचे कौतुक

‘कॉफी विथ व्हीसी’तून गुणवंतांचे कौतुक

91505
‘कॉफी वूथ व्हीसी’तून गुणवंतांचे कौतुक
कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांचा संवाद; शिवाजी विद्यापीठातील उपक्रम; शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन
संतोष मिठारी : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २६ : शिक्षण, संशोधन, साहित्य, शोधनिबंध लेखन, नवनिर्माण आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी अशा गुणवंतांचे कौतुक ‘कॉफी वूथ व्हीसी’ या उपक्रमातून शिवाजी विद्यापीठात होत आहे. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी गेल्या अडीच वर्षांपूर्वी सुरू केलेला हा वेगळा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.
विद्यापीठातील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थ्याने त्यांच्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करून स्वतःसह विद्यापीठाचा नावलौकिक वाढवितात. त्यांचे कौतुक करून त्यांचा संबंधित क्षेत्रातील प्रवास जाणून घेण्याच्या उद्देशाने कुलगुरू डॉ. शिर्के यांनी ‘कॉफी वूथ व्हीसी’ उपक्रमाची सुरूवात केली. त्यात या गुणवंतांना कुलगुरू डॉ. शिर्के हे आपल्या कक्षात बोलावून त्यांचा पुस्तक देऊन सत्कार करतात. गुणवंतांची यशदायी कामगिरी, जीवनप्रवास, भविष्यातील ध्येय आदींबाबत ते संवाद साधतात. त्यांनी आतापर्यंत विविध १९ जणांशी संवाद साधला आहे. त्यात प्रा. डॉ. के. डी. पवार , डॉ. टी. डी. डोंगळे (स्कूल ऑफ नॅनो सायन्स), जी. एस. राशिनकर, एस. डी. डेळेकर (रसायनशास्त्र विभाग), ज्योती जाधव (बायोकेमिस्ट्री विभाग), एस. बी. चव्हाण (तंत्रज्ञान अधिविभाग), ए. डी. जाधव (प्राणीशास्त्र विभाग), किरण गुरव (मराठी अधिविभाग), सी. ए. लंगरे (इंग्रजी अधिविभाग), नीलेश तरवाळ (भौतिकशास्त्र विभाग), डॉ. विलास शिंदे (प्रभारी कुलसचिव), आदींचा समावेश आहे. या उपक्रमावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील देखील उपस्थित असतात.
--------------
कोट
विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांनी उल्लेखनीय यश मिळविल्यानंतर त्यांचा विभागाकडून, नातेवाईक, मित्र-मंडळींकडून त्यांचा सत्कार व्हायचा. पण, ते ज्या ठिकाणी कार्यरत आहेत. त्या विद्यापीठाकडून त्यांचे कौतुक करण्याची विशिष्ट अशी यंत्रणा नव्हती. त्यावर विद्यापीठ या कुटुंबाचा प्रमुख म्हणून गुणवंतांचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्याकरिता ‘कॉफी वूथ व्हीसी’ उपक्रमाची सुरूवात केली. आता हा उपक्रम गुणवंतांचा आनंद सोहळा बनला आहे.
- डॉ. दिगंबर शिर्के, कुलगुरू
---------------
चौकट
कौतुकाची थाप प्रेरणा देणारी
विद्यापीठाच्या सर्वोच्चपदी विराजमान मान्यवरांनी या ‘कॉफी वूथ व्हीसी’ उपक्रमातून तत्काळ दिलेली ही कौतुकाची थाप प्रेरणा देणारी असते. यातून इतरांना देखील प्रेरणा मिळते. ही केवळ कॉफी नव्हे, तर आणखी उत्तुंग यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा असते, असे डॉ. विलास शिंदे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com