
सत्याग्रह आंदोलन
91618
भाजप विरोधात काँग्रेसचे सत्त्याग्रह आंदोलन
राहुल गांधी यांच्या खासदारकी रद्दवरून कार्यक्रर्ते आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २६ : खासदारकी रद्द करुन राहुलजी गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसने भाजप सरकारचा निषेध करत पापाची तिकटी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुळ्याजवळ सत्यागृह आंदोलन केले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार हे आंदोलन करण्यात आले.
काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राहुल गांधी आगे बढो, हम तुम्हारे साथ है, लढेंगे जितेंगे, इन्कलाब जिंदाबाद, आवाज दो हम एक है. भाजप सरकार मुर्दाबाद,आरएसएस मुर्दाबाद, चले जावो-चले जावो मोदी सरकार चले जावो अशा जोरदार घोषणा देत भाजप सरकारचा निषेध केला.
आमदार पी. एन. पाटील म्हणाले, ‘भाजप सरकारला हातातील सत्ता निघून जात असल्याचे दिसत आहे. अदानी कोण आहेत? त्यांना सरकारने किती पैसे दिले, वीस हजार कोटी रुपये त्यांच्या खात्यावर कोठून आले? याबद्दल राहुल गांधी १९ दिवसापासून विचारत आहेत. त्याला उत्तर दिले जात नाही. चार वर्षापूर्वी कर्नाटक केलेल्या व्यक्त्याचा आधार घेत कारवाई केली आहे. कर्नाटकमधील घडलेल्या घटनेचा दावा गुजरातमध्ये केला आहे. त्यांच्यावर चुकीच्या पध्दतीने गुन्हा घातला आहे. देशाला ज्यांनी अडचणीत आणले आहे, असे सर्व मोदी परदेशात पळून गेले आहे. हेच राहुल गांधी यांनी सांगितले. पण त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.’
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, ‘राहुल गांधी यांची लोकप्रतियता वाढत आहे. याचीच भाजपने भीती घेतली आहे. चुकीच्या कारभारवर बोलण्याचे काम गांधी करत आहेत. लोकांवर दबाव टाकून लोकशाही मोडित काढण्याचे काम केले जात आहे. भविष्यात लोकशाहीऐवजी हुकूमशाही होणार असल्याचे चित्र आहे. भविष्यात आपल्याला मतदानाचा हक्कही हिरावून घेलता जाईल.’
आमदार राजूबाबा आवळे, आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शशांक बावचकर, राहुल पाटील, सुर्यकांत पाटील- बुद्धीहाळकर, शारंगधर देशमुख, बाजीराव खाडे, सुप्रिया साळोखे, सरलाताई पाटील, निलोफर आजरेकर, बाबासो चौगले, विद्याधर गुरबे, बाळासाहेब खाडे, बयाजी शेळके, किशोर खानविलकर, महमंद शेख उपस्थित होते.
चौकट
पदयात्रेच्या प्रतिसादामुळे कारवाई
पदयात्रेमुळे राहुल गांधी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचले आहेत. महात्मा गांधीनंतर राहुल गांधी यांनी देशात पदयात्रा केली आहे. याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली असल्याचेही पाटील यांनी सांगितले.