
गड- आठवडा बाजार
फोटो क्रमांक gad२६६.jpg
91508
गडहिंग्लज : वाढता उष्मा आणि रमजानमुळे मागणी वाढल्याने कलिंगडाचे दर तेजीत आहेत. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)
----------------------
फळे,फळभाज्यांचे दर तेजीत
गडहिंग्लज बाजारपेठ : कांदा, लसूण, बटाटा स्थिर, चिंचेचा भाव कायम
गडहिंग्लज, ता. २६ : येथील फळबाजारात मुळातच आवक कमी आहे. त्यातच रमजानमुळे मागणी वाढल्याने फळे महागली आहेत. सरासरी १५ ते २५ टक्क्यांनी दर वाढले आहेत. भाजीमंडईत पालेभाज्या आणि फळभाज्यांची आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत. चिचेंचा भाव टिकून आहे. कांदा, लसूण, बटाट्याचे दर स्थिर आहेत. जनावरांच्या बाजारात म्हशींची आवक कमी आहे.
दोन महिन्यांपासून फळबाजारात द्राक्षे वगळता सर्वच फळांची आवक कमी आहे. दोन दिवसांपासून मुस्लिम समाजात पवित्र मानला जाणारा रमजान सुरू झाला आहे. रमजानचे रोजे सोडण्यासाठी फळे वापरली जातात. त्यामुळे फळांना मागणी जास्त आहे. सांगली जिल्ह्यातून येणाऱ्या द्राक्षांचा हंगाम बहरात आहे. किलोचा ४० ते ६० रुपये असा दर आहे. परदेशी सफरचंदाचे दर चढेच आहेत. किलोला १५० ते २०० रुपये अशी विक्री सुरु आहे. संत्रीसदृश माल्टा, डाळींब, पेरू १०० ते १५० रुपये किलो आहेत. कलिंगडला वाढत्या उष्म्यामुळे मागणी असून आकारानुसार ३० ते १०० रुपयापर्यंत दर आहेत. कोकणातील हापूस आंब्याची आवक वाढली असून गेल्या महिन्यापासून सुरु झालेला चिंचेचा हंगाम जोरात आहे. ग्रामीण भागातून आवक लक्षणीय वाढली असून ३० ते ५० रुपयापर्यंत किलोचा दर आहे.
पालेभाज्या, कोंथिबिर १० ते १५ रुपये पेंढी असून गवारीचा दराची तेजी टिकून आहे. गवार १०० रुपये किलो आहे. फळभाज्या सरासरी ६० ते ८० रुपये किलो आहेत. केवळ कोबी, टोमॅटोचे भावच कमी आहेत. हिरवी मिरची ८० ते १०० रुपये किलो आहे. कांदा १० ते २० रुपये, बटाटा २० ते ३० रुपये किलो आहे. लसूण ५० ते ९० रुपये किलो आहे. जनावरांच्या बाजारातही उन्हाळ्यामुळे आवक कमी असून दरही अधिक आहेत. म्हशींची ५० पेक्षा अधिक आवक होऊन २५ ते ८५ हजार रुपयापर्यंत दर होते. शेळ्या-मेंढ्यांची ८० हून अधिक आवक होऊन ५ ते १५ हजारांपर्यंत दर होते.
चौकट..
खजूरला मागणी
रमजानचे रोजे सोडण्यासाठी खजूरचा वापर वाढल्याने मागणी वाढली आहे. बाजारात विविध खजूर उपलब्ध असून लाल खजूर ७० ते १५० तर काळी खजूर २०० ते हजार रुपये किलो असा दर आहे. आवक अधिक असल्याने गतवर्षीच्या तुलनेत दर कमी आहेत.