Wed, June 7, 2023

गड-संक्षिप्त
गड-संक्षिप्त
Published on : 26 March 2023, 1:46 am
91428
श्रुती चौगुले
श्रुती चौगुले रौप्यपदकाची मानकरी
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयाची खेळाडू श्रुती चौगुले हिने अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कायाकिंग स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले. पंजाब येथील पटियाला विद्यापीठात स्पर्धा झाली. श्रुतीने शिवाजी विद्यापीठ संघातून खेळताना १००० मीटर के-१ क्रीडा प्रकारात वैयक्तिक रौप्यपदक पटकावले. श्रुतीच्या चमकदार कामगिरीमुळे शिवाजी विद्यापीठाला पहिले पदक मिळाले. शिवराज विद्यासंकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव डॉ. अनिल कुराडे, उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांचे प्रोत्साहन तर क्रीडाशिक्षक डॉ. राहुल मगदूम व प्रा. जयवंत पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.