
होमिओपॅथी परिषदेचे उद्घाटन
91566
कोल्हापूर : ‘होमेसाकॉन’ परिषदेचे उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते झाले. या वेळी डॉ. सुनेत्रा शिराळे, डॉ. बिपीन जैन, डॉ. राजकुमार पाटील, डॉ. राहुल जोशी, डॉ. रोझारिओ डिसोझा, डॉ. राजेश कागले, डॉ. अजित वेलणकर उपस्थित होते.
आरोग्य विद्यापीठाच्या विभागीय
कार्यालयासाठी त्वरित जागा देवू
खासदार महाडिक; ‘होमिओपॅथीक’तर्फे ‘होमेसाकॉन’ परिषद
कोल्हापूर, ता. २६ : ‘‘महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या विभागीय कार्यालयास कोल्हापूरमध्ये शासनाची जागा त्वरित उपलब्ध करून देण्यात येईल,’’ असे आश्वासन खासदार धनंजय महाडिक यांनी दिले.
होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज एक्स स्टुडंटस असोसिएशनतर्फे (होमेसा) ‘होमेसाकॉन’ परिषदेचे उद्घाटन खासदार महाडिक यांच्या हस्ते झाले. होमिओपॅथिक वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सभागृहात परिषद झाली.
महाडिक म्हणाले, ‘‘आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विभागीय कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास कोल्हापूरमध्ये वैद्यकिय संशोधन केंद्र सुरू होण्याचा मार्ग उपलब्ध होईल. या विभागीय कार्यालयाचा फायदा पाच जिल्ह्यातील सुमारे ८० महाविद्यालयातील विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना होईल. होमिओपॅथच्या प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करू. लवकरच वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याबरोबर बैठकिचे नियोजन करू.’’
डॉ. बिपीन जैन म्हणाले, ‘‘आरोग्यासाठी भविष्यात होमिओपॅथी सक्षम पर्याय जर सत्यात उतरवायचा असल्यास आपल्या देशामध्ये सार्वत्रिक आरोग्य सेवेत होमिओपॅथीचा अंर्तभाव प्रभावीपणे करावा लागेल.’’ डॉ. राहुल जोशी (मुंबई) यांनी ‘तत्काळ उद्भवणाऱ्या आजारासाठी होमिओपॅथिची आवश्यकता’ यावर होमिओपॅथी औषधप्रणालीनुसार रूग्णांची माहिती कशा प्रकारे घ्यायची यावर मार्गदर्शन केले. सतत उद्भवणाऱ्या आजारांपासून ते दीर्घ मुदतीच्या आजारावरती अद्ययावत होमिओपॅथीक उपचारा संबंधी विवेचन केले.
‘राष्ट्रीय होमिओपॅथी आयोग २०२२ मधील बदल’ यावर प्राचार्य डॉ. रोझारिओ डिसोझा यांनी आयोगाची रचना, उद्दिष्ट्ये यासह होमिओपॅथी औषधप्रणाली, शिक्षणांचा विकासावर होणारे सकारात्मक परिणाम विषद केले. डॉ. प्रशांत तांबोळी (मुंबई) यांनी ‘होमिओपॅथिचा संशोधन विकास’ यावर मार्गदर्शन केले. डॉ. संतोष रानडे, डॉ. कल्याणी कातकर, डॉ. श्रेयस पांचाल आदींची व्याख्याने झाली. ‘होमेसा’चे अध्यक्ष डॉ. राजकुमार पाटील यांनी स्वागत केले. संयोजक सचिव डॉ. सुनेत्रा शिराळे यांनी ‘आपला ग्रह आपले आरोग्य होमिओपॅथीसह’ या परिषदेच्या संकल्पनेबाबत माहिती दिली. सचिव डॉ. राजेश कागले यांनी आभार मानले.
परिषदेसाठी डॉ. मंदार कुंटे, डॉ. अजित वेलवणकर, डॉ. हिम्मतसिंह पाटील, डॉ. सुहास पाटील, डॉ. चेतन जोशी, डॉ. हर्षवर्धन जगताप, डॉ. महादेव गावडे, डॉ. शितल पाटील यांच्यासह ४०० होमिओपॅथ्स उपस्थित होते. १००० होमिओपॅथ्सनी ऑनलाईन उपस्थिती दर्शविली.