रणरणत्या उन्हातही भाविक अंबाबाई चरणी

रणरणत्या उन्हातही भाविक अंबाबाई चरणी

91533
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात रविवारी भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केली.


रणरणत्या उन्हातही
भाविक अंबाबाई चरणी
समितीकडून भाविकांसाठी सोय; उर्वरित भागात ही मॅटींग टाकण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २६ : रणरणत्या उन्हातही आज परगावचे भाविक, पर्यटक करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चरणी नतमस्तक झाले. नुकत्याच संपलेल्या दहावीच्या परिक्षेनंतर रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने कोल्हापूरात पर्यटकांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली. मुंबई, पुणे, उत्तर महाराष्ट्र, कर्नाटकातून आलेल्या भाविकांमुळे अंबाबाई मंदिर परिसराला भव्य जत्रेचे स्वरूप आले होते. पर्यटकांनी अंबाबाईच्या दर्शनासह जोतिबा, पन्हाळासह सायंकाळी रंकाळ्यावर गर्दी केली.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर मंदिर आवारात मंडप उभारले आहे. तसेच ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा केली आहे. मंदिर परिसरातीलच पागा बिल्डिंगमध्ये तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या स्वच्छतागृहांमुळे भाविकांची कुचंबणा कमी झाली आहे. तसेच पिण्याचे पाणी व परिसरात टाकलेल्या मॅटिंगमुळे उन्हापासून भाविकांना थोडा दिलासा मिळतो आहे. मात्र जुना राजवाडा पोलिस स्टेशनच्या समोरील बाजूस पर्यटकांची मोठी वर्दळ असते. तेथेच अनेक व्यावसायिक छोट्या मोठ्या साहित्यांची विक्री करतात. या सर्वांनाच त्या परिसरात उन्हाचा चटका बसत असून यंदा लवकर मॅटिंग व मंडप देवस्थान समितीने उभारावेत, अशी अपेक्षा भाविक व छोट्या व्यावसायिकांनी व्यक्त केली.
----------
कोट
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये आम्ही दरवर्षी श्री अंबाबाई व जोतिबाचे दर्शन घेतो. यंदा उन्हाचा कडाका आतापासूनच जाणवू लागला आहे. समितीने सोय केली आहे, परंतू ती अपुरी वाटते. मंदिर आवारात उन्हामुळे जीव कासावीस होतो. अन्य ठिकाणी ही मॅटिंग आणि मंडप टाकल्यास उन्हाचा त्रास कमी होण्यास मदत होईल.
- स्नेहल लाड, पर्यटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com