
आल्लं महागलं
91588
कोल्हापूर : चटणी तयार करण्याची लगबग सुरु असल्याने आल्ल्याचे दर वाढलेले आहेत.
91589
कोल्हापूर : विविध प्रकारच्या पालेभाज्याही मुबलक आल्या आहेत.
आल्लं शंभर रुपये किलो...!
पालेभाज्याही भरपूर; अन्य भाज्यांचे दर स्थिर
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २६ : चटणीसाठी लगबग सुरु आहे. चटणीसाठी लागणारे मसाले, पांढरा कांदा, कोथींबीर, लसूण जशी आवश्यक असते, त्यापद्धतीने आल्लंही टाकलं जाते. याकरीता आल्ल्याच्या दरात १०० रुपये किलोची वाढ झाली. एरव्ही ३०/४० रुपये किलोपर्यंत आल्ल्याचा दर असतो. चटणीचा सिझन झाला की, दर कमी होतील, असे काही विक्रेत्यांनी सांगितले.
याबरोबर विविध प्रकारच्या पालेभाज्यांची ही आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. पाच ते दहा रुपयाला मिळणारी मेथीची पेंडी आता ३० रुपयांना दोन अशी विक्री सुरु आहे. एप्रिल-मे मध्ये मेथीच्या दरात काहीशी वाढ होणार आहे, असे विक्रेते म्हणाले. दरवर्षी एप्रिल-मेच्या दरम्यान मेथीचा दर हा वाढतच असतो.
----------------
फळभाजी (प्रतिकिलो रुपये)
बिनीस*८०
हिरवा वाटाणा*१००/८०
देशी गवारी*१००
बंदरी गवारी*८०
कारली*४०
दोडका*४०
काळा दिडगा*८०
भेंडी*६०
काटे काकडी*३०
जवारी काकडी*४०
गाजर*४०
बेळगावी गाजर*४०
लालभडक टोमॅटो*१०/१५/२० (आकारमानानुसार)
ऊसावरील घेवडा शेंग*६०
आल्लं*१००
हैदराबादी काळी वांगी*३०
शेवगा शेंग*१० रुपयाला तीन शेंगा
लाल बीट*५/१० रुपये नग
फ्लॉवर*२०/२५ रुपये एक नग
कोबी*१० रुपये एक नग
हिरवा टोमॅटो*१० (भाजीसाठी)
हिरवी पांढरी वांगी*४०
ढब्बू मिरची*४०
वरणा*४०
लिंबू*१० रुपयाला चार/पाच
हेळवी कांदा*१०/२०
लसूण*६०/७०
बटाटा*२०
हिरवी मिरची*४०
तोंदली*५०
घोसावळे*४०
कच्ची केळी*४० रुपये डझन
कच्ची हळद (लोणचे)*४०
नवलकोल*१० रुपयाला दोन नग
सुरण गड्डा*८०
आळूचे गड्डे*८०
खुटवडा*४०
केळ फुल*२०
--------------
पालेभाजी (प्रतिपेंडी)
कोथींबीर*५/१०
लाल माट*५/१०
तांदळी*५/१०
मेथी*३० रुपयाला दोन नग
पालक*१०
करडई*१५ रुपयाला दोन पेंड्या
चुका*१०
आंबाडा*१०
पोकळा*१०
------------------
फळांचे दर (प्रतिकिलो)
देशी पेरु*५०
हिरवी कलिंगडे *१०/५०.१०० (आकारमानानुसार)
हिरवी द्राक्षे *४०/५०
देशी केळी *४०/५० रुपये डझन
टरबूज *१० रुपयाला एक नग
----------
सोने-चांदीचे दर अपडेटस् (प्रतिकिलो/प्रतितोळा) (रविवारी सायंकाळी साडेपाच पर्यंत घेतलेले दर)
सोने*६१,०६५ प्रतितोळा
चांदी*७३,४०० प्रतिकिलो
-----------------
धान्य-कडधान्याचे दर (प्रतिकिलो रुपये)
ज्वारी*४०/६०
गहू*३८/४५
रत्नागिरी तांदूळ*४५/५०
एचएमटी तांदूळ*५०
कोलम तांदूळ*६०/६५
कर्जत तांदूळ*२८/३०
आंबे मोहोर*८०
घनसाळ तांदूळ*७५
हरबरा डाळ*७०/७५
तुरडाळ*११५/१२०
मसूर डाळ*९५
मुगडाळ*११५/१२०
उडीद डाळ*१२०
मटकी*१००/१६०
चवळी*८०/९०
मसूर*९०/२६०
हिरवा वाटाणा*७०/८०
काळ वाटाणा*८०
पावटा*२००/२१५
हुलगा*८०/८५
हिरवा मूग*९५/१००
पोहे*४५
शेंगदाणा*१२०/१३०
साबदाणा*६५/७०
साखर*४०
91597
कोल्हापूर : आगळावेगळा बिटका हापूस घेण्यासाठी लक्ष्मीपुरी मंडईत गर्दी होती.
बिटका हापूस बाजारपेठेत...!
कोल्हापूर, ता. २६ : हापूस आंबा आकाराने मोठा असतो. गोड असतो, हे अनेकांमा माहिती असते; पण पहिल्यांदाच लक्ष्मीपुरी यासीन बागवान यांनी बिटका हापूस विक्रीसाठी उपलब्ध करुन दिला आहे. असाहा हापूस आंबा घेण्यासाठी सकाळपासून गर्दी होती. पेढ्यासारखी चव असणारा हा हापूस लहान तर असतो, पण अगदी हापूस सारखी चव असते. याबाबत यासीन म्हणाले, ‘‘विजयदुर्गमधून हा बिटक्या हापूसच्या पेट्या आणल्या आहेत. १६०/२०० रुपये डझन दराने सध्या विक्री सुरु आहे.’’ अनेक लोक हा बिटका हापूस पाहतात आणि घेतात ही. निश्चित तो लक्ष वेधून घेतो.杮