पाणीपुरवठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणीपुरवठा
पाणीपुरवठा

पाणीपुरवठा

sakal_logo
By

पाणी पुरवठा आजपासून पुर्ववत
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर ता. २६ : बालिंगा आणि नागदेववाडी येथील वीज जोडणीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे रविवारी (ता. २६) रात्रीपासूनच बालिंगा उपसा केंद्रावरुन पाणी उपसा सुरू करण्यात येणार आहे. महावितरणच्या कामामुळे या दोन्ही उपसा केंद्रावरील पंपींग सेक्शन बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे एबीसीडीमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने झाला होता. काही भागात एक दिवसआड पाणी येणार असेही महापालिकेकडून जाहीर करण्यात आले होते. दरम्यान, उद्या (ता. २७ ) पासून पाणी पुरवठा पूर्ववत होईल, असे प्रशासनाने सांगितले.
शहरात होणारा अपुरा पाणी पुरवठ्यावरून अनेक भागात आंदोलने झाली होती. माजी नगरसेवकांनी तर जल अभियंत्यांना दोन तास घेराव घालून धारेवर धरले होते. त्यावेळी अधिकारीच जबाबदार असाही आरोप करण्यात आला होता. दरम्यान, वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी दोन्ही उपसा केंद्रे बंद ठेवली होती. दोन दिवस शहराला पाणी पुरवठा होणार नाही, असे महापालिकेने जाहीर केले होते.
पाणीपुरवठा कमी दाबाने असला तरी बहुतांशी भागात पाणी पूर्ण बंद करण्याविषयी कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात आला. अपुरा पाणीपुरवठा काळात बावडा जलशुद्धीकरण केंद्रावरून सोडून नऊ टँकर आणि कळंबा फिल्टर हाऊसमधून बारा टँकर पाणीपुरवठा करून नागरिकांची सोय करण्यात आली.
-------------
कोट
दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असल्यामुळे बालिंगा आणि नागदेववाडी केंद्रे रविवारी (ता. २६) रात्रीपासूनच हे पंपींग सेंटर सुरू होतील त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा उद्या (ता. २७ ) पासून पूर्ववत सुरळीत होईल.
- हर्षदीप घाडगे, जल अभियंता