औद्योगिक महामंडळाची कामे मजूर संस्थांना मिळावीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औद्योगिक महामंडळाची कामे मजूर संस्थांना मिळावीत
औद्योगिक महामंडळाची कामे मजूर संस्थांना मिळावीत

औद्योगिक महामंडळाची कामे मजूर संस्थांना मिळावीत

sakal_logo
By

ich269.jpg
91631
कोल्हापूर ः उद्योगमंत्री उदय सामंत यांना मजूर संघाचे चेअरमन प्रमोद पोवार यांनी मागण्यांचे निवेदन दिले.
---------
औद्योगिक महामंडळाची कामे मजूर संस्थांना मिळावीत
कोल्हापूर जिल्हा मजूर सहकारी संस्थेतर्फे उद्योगमंत्र्यांकडे मागणी
इचलकरंजी, ता. २६ : औद्योगिक महामंडळातील सर्व कामे प्रचलित पध्दतीनुसार ३३ टक्केप्रमाणे फक्त निविदा मागवून करावीत. मजूर सहकारी संस्था, बेरोजगार अभियंते, लोकसेवा संस्था, बेरोजगारांच्या संस्था यांना प्राधान्याने कामे मिळावीत, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा मजूर सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रमोद पोवार यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना निवेदनाद्वारे केली आहे.
विनानिविदा कामे देण्यात येऊ नयेत किंवा देण्यासाठी प्रस्तावित करु नयेत तथापि, अशा संस्थांना शासकीय नियमाप्रमाणे निविदा प्रक्रियेत भाग घेण्यास हरकत करू नये, मुख्य अभियंता म. औ. वि. म. पुणे - ३ यांनी २९/०९/२००९ रोजी मजूर संस्थांना रेशोप्रमाणे कामे न देण्याबाबत त्यांच्या अखत्यारीत असलेल्या कार्यालयांना परिपत्रक जारी केले आहे. ते रद्द करावे. सध्या कोल्हापूर जिल्हातील मजूर संस्थांना कामे अपूरी पडत असल्याने मजूर चळवळ भक्कम होण्याच्या दृष्टीने ३३ टक्के या प्रमाणात मजूर संस्थांनाच कोटा मिळणे आवश्यक आहे.
तरी वरिल सर्व बाबींचा विचार करून शासनाच्या धोरणाप्रमाणे संबधीत शासकीय यंत्रणेस ३३ : ३३ : ३४ या प्रमाणात ३३ टक्के मजूर संस्थांना कामे देण्यासंदर्भात सुचित करावे, असे कोल्हापूर जिल्हा मजूर सहकरी संस्थांचा संघाचे चेअरमन प्रमोद पोवार मंत्री सामंत यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावर मंत्री सामंत यांनी याबाबत गांभीर्याने विचार करून असे आश्वासन दिले. शिष्टमंडळात मजूर सहकारी संघाचे शरद करबे, संजय मोहिते, बाळासाहेब पाटील, सांगवकर, संदीप बाराड, अविनाश पोवार, विठ्ठल पाटील, श्रीकांत जाधव आदी उपस्थित होते.