Thur, June 1, 2023

नीट मॉक टेस्ट २३ एप्रिलला
नीट मॉक टेस्ट २३ एप्रिलला
Published on : 27 March 2023, 12:08 pm
नीट मॉक टेस्ट २३ एप्रिलला
इचलकरंजी, ता.२७ ः मेडीकलच्या विविध अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय पातळीवर ‘नीट’ प्रवेश परीक्षा घेतली जाते. या परिक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मनातील भिती कमी करण्यासाठी पालक शिक्षक संघातर्फे नीट मॉक टेस्ट घेण्यात येणार आहे. २३ एप्रिलला तात्यासाहेब मुसळे हायस्कूल येथे दुपारी २ ते सव्वापाच या कालावधीत ही टेस्ट घेण्यात येणार आहे. या शिवाय गडहिंग्लज व सांगली येथे केंद्रावरही हा उपक्रम घेण्यात येणार आहे.
पालक शिक्षक संघातर्फे यंदाही नीट मॉक टेस्टचे आयोजन केले आहे. उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रा. एच. ए. पाटील, प्रा. एस. जे. पाटील, प्रा. व्ही. व्ही. देवकारे, डॉ. मनिष शेट्टी यांनी केले आहे.