वसुली जोरात

वसुली जोरात

वसुली ७५ टक्क्यापर्यंतच
घरफाळा, पाणीपुरवठा विभागाची स्थिती; ‘इस्टेट’ मध्येही कमीच
कोल्हापूर, ता. २७ : महापालिकेच्या उत्पन्नातील प्रमुख स्त्रोत असलेल्या घरफाळा व पाणीपुरवठा विभागाची वसुलीची धाव यंदाच्या उद्दिष्टापैकी ७० ते ७५ टक्क्यापर्यंतच जाणार आहे. येत्या चार दिवसात घरफाळ्याकडे ७५ तर पाणीपुरवठा विभागाकडे ५० कोटीपर्यंतच महसूल जमा होण्याची चिन्हे आहेत. गाळेधारकांचे भाडे अपेक्षित धरून इस्टेट विभागाच्या निश्‍चित केलेल्या ३८ कोटी उद्दिष्टापैकी केवळ साडेसात कोटी जमा होणार आहेत. तर नगररचनाचे ७५ कोटीपैकी ५७ कोटी जमा झाले आहेत. त्यामुळे गेल्यावर्षीच्या अंदाजपत्रकातील महसुलात ९० कोटींवर तूट जाणवणार आहे.
महापालिकेचे अंदाजपत्रक वस्तुस्थितीदर्शक असत नाही असा आरोप विविध संघटनांकडून कायम केला जात असतो. गेले अंदाजपत्रक ९८८ कोटींचे होते. त्यात घरफाळा, पाणीपट्टी, नगररचना विभाग, इस्टेट या विभागांवर महसूल जमा करण्याची भिस्त दिसत होती. आता चार दिवसावर वर्ष संपत आले आहे. या कालावधीत गेल्यावर्षी दिलेले उद्दिष्ट व सध्याची जमा पाहता प्रत्येक विभागात २२ कोटींपासून ३० कोटींपर्यंत फरक आहे. घरफाळ्यात अजून २८ कोटी ४८ लाखांची तूट आहे. पाणीपुरवठा विभागात २२ कोटींची तर नगररचना विभागात १८ कोटींची तूट आहे. इस्टेट विभागात ३० कोटींची तूट आहे. या विभागात गाळेधारकांचे थकलेले भाडे जमा होणाच्या शक्यतेने उद्दिष्ट ३८ कोटींचे होते. पण शासनाने ॲडव्हान्स भरून घेण्यास सांगितल्याने साडेचार कोटीपर्यंतच भाडे जमा होऊ शकते. तसेच होर्डिंग्ज, भाजी मार्केट, जलतरण तलाव, हॉल, पार्किंग अशा साऱ्यांचे मिळून साडेसात कोटीपर्यंतच महसूल जाऊ शकतो. परवाना विभागाचे कायमचे कमी उत्पन्न लक्षात घेऊन यंदा व्यवसायांचे रिव्हीजन करण्याचे ठरवले आहे. यंदा एक कोटी ६५ लाखांची तूट येणार आहे. गेल्यावर्षीही २ कोटी २० लाखापर्यंतच वसुली झाली होती.
------------------
विभाग*उद्दिष्ट*जमा
घरफाळा*९९ कोटी ४८ लाख*७१ कोटी ६१ लाख
पाणीपुरवठा*७० कोटी*५० कोटीपर्यंत
नगररचना* ७५ कोटी* ५७ कोटी
इस्टेट*३८ कोटी*७ कोटी ५० लाख
परवाना*३ कोटी७५ लाख*२ कोटी १० लाख
-----------------
शेवटच्या टप्प्यात सरकारीच देणी
३१ मार्चला चार दिवस राहिले असून जास्तीत जास्त नागरिकांना कर भरणा करता यावा यासाठी नागरी सुविधा केंद्रे सोमवारपासून ३० मार्चअखेर रात्री १० वाजेपर्यंत तर ३१ मार्च रोजी रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. घरफाळा व पाणीपुरवठा विभागात आता शेवटच्या दिवसात सरकारी कार्यालयांकडूनच मोठा भरणा होऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com