राजाराम कारखाना सतेज पाटील

राजाराम कारखाना सतेज पाटील

लोगो- राजाराम कारखाना निवडणूक

फोटो 91729

आमचं ठरलंय, कंडका पाडायचा
आमदार सतेज पाटील; विरोधी आघाडीने शक्तिप्रदर्शनाने भरले अर्ज

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७. ‘आमचं ठरलंय, कंडका पाडायचा’ यंदा परिवर्तन झालेच पाहिजे, अशा जोरदार घोषणा देत आमदार सतेज पाटील यांनी छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यांच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आपल्या श्री राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या सर्व उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आमदार पाटील यांनी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सासने मैदान ते जिल्हा उपनिबंधक कार्यालयापर्यंत सभासद व कार्यकर्त्यांचे शक्ती प्रदर्शन केले.
सासने मैदान येथून शक्तिप्रदर्शनाला सुरुवात झाली. त्यानंतर स्टेशन रोडवरून जिल्हा उपनिबंधक कार्यालयात उमदेवारी अर्ज दाखल केले.
आमदार पाटील म्हणाले, ‘‘उसाचा कंडका पडतो, तसा राजाराम साखर कारखान्यांच्या विषयाचा कंडका पडला पाहिजे, अशी सभासदांची भूमिका आहे. कोल्हापूरमधील सभासद आणि विरुद्ध हुकूमशाही अशी ही लढाई आहे. कारखाना अठ्ठावीस वर्ष ज्यांच्या ताब्यात आहे त्यांनी सभासदांच्या उसाला दोनशे रुपये दर कमी देण्याचे पाप केले आहे. याविरुद्ध आम्ही सातत्याने लढा देत आहे. कोजन नाही, इथेनॉल प्रकल्प नाही. गेल्यावेळी बाहेरच्या सभासदांनी सत्ताधाऱ्यांकडे कारखाना दिला. पण, सभासदांना अपेक्षित दर मिळालेला नाही किंवा कारखान्याची प्रगती झालेली नाही. त्यामुळे सभासदांनी आता पाच वर्ष आमच्या ताब्यात कारखाना द्यावा. हा कारखाना कोल्हापुरातील १२ हजार सभासदांचा झाला पाहिजे. मात्र, बाहेरील सहाशे सभासद कोणाच्या तरी हातात कारखाना देतात. यापेक्षा कोल्हापूरमधील १२ हजार लोकांनी आपला कारखाना कोल्हापूरच्याच हाता द्यावा अशी विनंती करत आहे.
राजाराम कारखाना सभासदांच्या मालकीचा व्हावा. २८ वर्षे सभासदांची पिळवणूक होत आहे. त्यामुळेच राजारामसाठी ‘आमचं ठरलयं कंडका पाडायचा’ ही टॅग लाईन ठरली आहे. आताची निवडणूक पाटील विरूद्ध महाडिक नाही, तर कोल्हापूरमधील १२ हजार सभासद विरूद्ध सत्ताधाऱ्यांनी बाहेरचे केलेले ६०० सभासद अशी आहे. हा कारखाना कोणाच्या ताब्यात द्यायचा हे कोल्हापूरमधील १२ हजार सभासद सभासद ठरवतील. बाहेरच्यांनी चुकीच्या लोकांकडे कारखाना दिला याचा मूळ सभासदांना पश्‍चाताप होत आहे. यावेळी कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने, विजयमाला नेजदार, उतम सावंत, बाजीराव पाटील, अजित पाटील, अभिजित भंडारी, राजकुमार पाटील, दिलीप पाटील, बाबासो चौगले, शाशिकांत पाटील चुयेकर, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, हिंदूराव ठोंबरे, बाबासो माळी, विजय पाटील, बी. आर. पाटील, महेश चव्हाण, शशिकांत खवरे उपस्थित होते

चौकट
सभासदांना २०० रुपये कमी कशासाठी?
राजाराम कारखाना कोल्हापूरच्या सभासदांची मालकीचा झाला पाहिजे. त्यांना प्रतिटन दोनशे रुपये कमी दिले जात आहेत. इतर कारखाने ३००० ते ३१०० रुपये देत असताना राजाराम कारखान्याकडून मात्र प्रतिटन उसाला २८४० ते २९०० रुपये दर दिला जात आहे. हिच वाढीव रक्कम सभासदांना मिळाली पाहिजे, यासाठी आपला अजेंडा असणार आहे, असेही आमदार पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com