वैराग्य साध्यतेने मनावर विजय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वैराग्य साध्यतेने मनावर विजय
वैराग्य साध्यतेने मनावर विजय

वैराग्य साध्यतेने मनावर विजय

sakal_logo
By

GAD274.JPG
91698
नांगनूर : सजवलेल्या मोती व हिरा अश्वांच्या सहभागाने झालेल्या रिंगण सोहळ्याचा भाविकांनी आनंद लुटला.
-------------------------------------------------------------
वैराग्य साध्यतेने मनावर विजय
भगवानगिरी महाराज : नांगनुरात लुटला रिंगण सोहळ्याचा आनंद
सकाळ वृत्तसेवा
नूल, ता. 27 : श्री राम या शब्दात प्रचंड ताकत आहे. श्री रामाला उघड्या आणि मिटलेल्या डोळ्यांनीही बघा. म्हणजे राम आणि आपण एकच आहोत, याची अनुभूती येईल. अभ्यास आणि वैराग्य साध्य झाल्यास मनावरही विजय मिळवता येतो, असे प्रतिपादन श्री राष्ट्रीय धर्माचार्य प. पू. स्वामी भगवानगिरी महाराज (नूल) यांनी केले.
नांगनूर (ता. गडहिगलज) येथे हरिपाठ मंदिराचा संकल्प व रिंगण सोहळ्यात ते बोलत होते. रिंगण सोहळ्यानिमित्त रस्त्याच्या दुतर्फा व प्रत्येक घरासमोर रांगोळी रेखाटली होती. महिलांनी पंचारतीने ओवाळून मोती व हिरा या माऊली अश्वांचे स्वागत केले. मिरवणुकीने अश्व राम मंदिराच्या प्रांगणात आणले. महाप्रसाद वाटप झाला. वीरकुमार पाटील यांनी अन्नदान केले. दुपारी ढोल ताशांचा गजर, लेझीम, टाळ मृदंगाचा निनाद, भजन, माऊलीचा गजर करीत विविध गावांच्या दिंड्यासह पालखी व अश्व रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी थोरल्या माळात दाखल झाले. मिरवणुकीमध्ये नांगनूर, बसर्गे, अर्जून चौगुले, मुंगूरवाडी, नांगनूर, हसूरवाडी, सोलापूर, नरेवाडी, सरोळी, अरळगुंडीतील दिंड्या सहभागी झाल्या. श्रीराम विश्वस्त व्यवस्था मंडळ व श्रीराम भजनी मंडळातर्फे सत्कार झाले. शिवनाथ एकनाथ रुमणे यांचे मनोगत झाले. श्री क्षेत्र कुहे पानाचे येथे सकारणार्‍या हरिपाठ मंदिरासाठी धनादेश दिला. अश्वपूजन अनिल माने, शाहू मोकाशी, सीमा मोकाशी यांच्याहस्ते झाले. आखलेल्या रिंगण पट्ट्यात वेगाने धावणार्‍या अश्वांच्या रिंगण सोहळ्याचा उपस्थितांनी आनंद लुटला.
ट्रस्टचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, बाळासाहेब मोकाशी, वीरकुमार पाटील, सरपंच सुप्रिया कांबळे, उपसरपंच विकास मोकाशी, शाहू मोकाशी, अनिल माने, तलाठी संगीता चौगुले, विश्वनाथ रुमणे, श्रीमंत दादाराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विक्रमसिंह मोहिते, श्रीमंत महादजीराजे शितोळे-सरकार, श्रीमंत दिलीपराव केशवराव रायजादे, श्रीमंत रमेश केशवराव रायजादे, श्रीमंत अविराजे शिंदे, श्रीमंत गुणवंत चव्हाण-पाटील, दत्तात्रय जाधव, शंकर महाराज, नारायणराव खनूकर, एकनाथ शिंदे, मच्छिंद्र वलवे, सचिन अनवठ, उत्तमराव कापसे, वाल्मीकराव जेठारे, प्रकाश तेलवेकर व भाविक उपस्थित होते. कृष्णा महाराज परेराव यांनी स्वागत केले. सुमन जाधव यांनी सूत्रसंचालन केले. पोपट मोकाशी यांनी आभार मानले.
---------------------------------------------------------------------
श्री. अजित माद्याळे