Sun, June 4, 2023

दुंडगेत हरिनाम सप्ताह सुरू
दुंडगेत हरिनाम सप्ताह सुरू
Published on : 28 March 2023, 12:38 pm
दुंडगेत हरिनाम सप्ताह सुरू
नूल : दुंडगे (ता. गडहिंग्लज) येथे हरिभक्त मंडळातर्फे हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वर पारायण व प्रवचन सोहळ्याचा प्रारंभ झाला. मंगल कलश मिरवणूक झाली. मंडप पूजन व गणेश पूजनसह पांडुरंग - ज्ञानेश्वरी तुकाराम महाराज फोटो पूजन झाले. हळदी कुंकू कार्यक्रम सरपंच शिवलिला पाटील, माजी सरपंच ज्योती धनवडे यांच्याहस्ते झाले. वीणा पूजनाने ज्ञानेश्वरी पारायण सुरु झाले. आप्पालाल नदाफ महाराज यांचे प्रवचन झाले. रात्री यळगुड माऊली भजनी मंडळ दुंडगे, हरिभक्त भजनी मंडळ हरळी यांनी हरी जागर केला. हरिनाम सप्ताहात रोज सायंकाळी प्रवचन, कीर्तन व महाप्रसाद आहे. सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन हरी भक्त मंडळाकडून केले आहे.