दि न्यू एज्युकेशन सोसायटी क्रेडिट सोसायटीतर्फे कार्यक्रम

दि न्यू एज्युकेशन सोसायटी क्रेडिट सोसायटीतर्फे कार्यक्रम

91722
कोल्हापूर : दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या सेवक वर्गाची को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीतर्फे निवृत्त सभासदांचा सत्कार करताना उपस्थित मान्यवर.

‘न्यु एज्युकेशन क्रेडिट’तर्फे
सभासद, पाल्यांचा गौरव
कोल्हापूर, ता. २८ : दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या सेवक वर्गाची को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीतर्फे निवृत्त सभासद, सभासदांच्या पाल्यांचा गुणगौरव सभारंभ राम गणेश गडकरी सभागृहात झाला.
नियामक मंडळाचे सल्लागार विनोदकुमार लोहिया, अध्यक्ष निर्मलकुमार लोहिया, उपाध्यक्ष नितीन वाडीकर, नेमचंद संघवी, सदस्य प्रशांत लोहिया, सचिव प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, क्रेडिट सोसायटीचे सर्व पदाधिकारी, सदस्य, तज्ज्ञ संचालक, स्विकृत आणि निमंत्रक सदस्यांच्या उपस्थित दिपप्रज्वलन झाले.
प्राचार्य एस. एस. चव्हाण म्हणाले, ‘‘या सोसायटीचे ३५० सभासद असन २४ कोटींच्या ठेवी, ४० लाखापर्यंतचे कर्ज वाटप केले जाते.’’ उपाध्यक्ष रुपाली पाटील यांनी परिचय करुन दिला.
निवृत्त सभासद हेमंत खानविलकर, गजेंद्र गडगे, रमेश देसाई, सुरेश कणीरे, इस्माईल अत्तार, दिलीप माने, मारुती कांबळे, श्रीकांत काकडे, संदीप कुलकर्णी, सारंगनाथ क्षीरसागर, भरत खिलारे, सुलभा कांबळे, अपर्णा देशपांडे, अनुपम साळी या सभासदांना विशेष वस्तु भेट दिली. ११० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला.
नितीन वाडीकर यांनी संस्थेने योग्य आर्थिक नियोजन केल्याचे सांगितले. विनोदकुमार लोहिया यांनी माजी अध्यक्ष (कै.) मदनमोहन लोहिया, सचिव (कै.) ए. डी. देशपांडे, (कै.) सी. जी. कुलकर्णी, (कै.) एस. जी. कुलकर्णी, (कै.) डी. जी. वाडीकर यांनी दुरदृष्टीने स्थापन केलेल्या भिशीचे वटवृक्षात रुपांतर झाले, असे सांगितले.
संचालक दस्तगीर जमादार, सयाजी पाटील, संजय हावळ, सतिश चिपरीकर यांनी गुणवंत विद्यार्थी आणि सभासदांच्या यादी वाचन केले. सागर बगाडे यांनी सुत्रसंचालन केले. संचालक तानाजी पाटील यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com