काही पत्रके

काही पत्रके

91764 श्रीकांत मनोळे,
91768 संजय जोशी,
91769 किशोर पालोजी

जिल्हा फोटोग्राफर्स को-ऑपरेटिव्ह
असोसिएशनची श्री१कांत मनोळे अध्यक्षपदी

कोल्हापूर : जिल्हा फोटोग्राफर्स को-ऑपरेटिव्ह असोसिएशनची निवडणूक बिनविरोध झाली. २०२३-२८ करिता संचालक मंडळाची नेमणूक केली. यामध्ये अध्यक्षपदी श्रीकांत मनोळे, उपाध्यक्ष संजय जोशी, सचिव किशोर पालोजी तर संचालकपदी देवदत्त आंबले, प्रकाश पाटील, सर्वेश देवरूखकर, जयदेव वोरपाळकर, विजय वडवे, अर्जुन टाकळकर, मोहन सुतार, शशीकांत कापुरे यांची निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून सी. एस. माळी यांनी काम पाहिले.
...
महाबँक रिटायरिज असोसिएशनचे अधिवेशन
कोल्हापूर : महाबँक रिटायरिज असोसिएशन संघटनेचे पाचवे त्रैवार्षिक अधिवेशन हॉटेल अयोध्या येथे झाले. अधिवेशनास कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, बेळगाव, गोवा येथील तीनशेहून अधिक सभासद उपस्थित होते. ऑल इंडिया बँक रिटायरिज फेडरेशनचे अध्यक्ष एस. एम. देशपांडे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. उपाध्यक्ष सुहास देशपांडे अध्यक्षस्थानी होते. श्री. देशपांडे यांनी राष्ट्रीय पातळीवर बँक निवृत्तांचे असलेल्या प्रश्नांची सध्याची स्थिती सांगितली. सुहास देशपांडे यांनी निवृत्तीनंतरही आपल्या मातृसंस्थेला सर्वतोपरी साह्य करावे, असे आवाहन केले. ७५ वर्षे पूर्ण झालेल्या सदस्यांचे शाल, फूल देऊन सत्कार केले. विद्यमान कार्यकारी अध्यक्ष सावनुरे यांनी नवीन कार्यकारिणी जाहीर केली. जनरल सचिव म्हणून अरुण राजाज्ञा, खजानिस सुहास नाईक, सहायक खजानिस उत्तम शेंडगे, अभिलेख सचिव विकास मोघे, संघटन सचिव राजमाने यांची बिनविरोध निवड झाली. जयंत आपटे यांनी आभार मानले.
...
लोकराज्य जनता पार्टीचा संवाद मेळावा
कोल्हापूर : लोकराज्य जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा शाहू स्मारक भवनमध्ये झाला. कार्यकर्त्यांनी संघटन बळकट करण्याबरोबर सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढण्याचा निर्धार केला. राष्ट्रीय अध्यक्ष अनिल चव्हाण यांच्या अध्यक्षस्थानी, जिल्हाध्यक्ष पी. के. पाटील प्रमुख उपस्थित होते. महिला आघाडीच्या जिल्हा कार्याध्यक्षा उज्ज्वला झेंडे, प्रदेश संघटक विलास चव्हाण, शहराध्यक्ष विजय केसरकर, अमोल कांबळे, राहुल धुळे यांची भाषणे झाली. महेश कांजर, शाहीन बारगीर यांच्यासह कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश झाले. सर्जेराव भोसले, शशिकांत जाधव, अशोक तोरसे, सुधाकर डोणोलीकर, आनंदा चव्हाण, कृष्णात सातपुते, अनिल वरेकर, नारायण लोहार, प्रमोद पाटील, प्रमोद जाधव, संदेश उपाध्ये उपस्थित होते. सुभाष भोसले यांनी सूत्रसंचालन केले. संतोष बिसुरे यांनी आभार मानले.
...
रिपब्लिकन यूथ फोर्सची कार्यकारिणी जाहीर
कोल्हापूर : पीपल्स रिपब्लिकन पार्टी प्रणित रिपब्लिकन यूथ फोर्सच्या करवीर तालुका कार्यकारिणी निवडीची बैठक शाहू स्मारक भवन येथे झाली रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष दगडू भास्कर प्रमुख उपस्थित, तर फोर्सचे जिल्हाध्यक्ष रमेश कांबळे अध्यक्षस्थानी होते. करवीर तालुकाध्यक्ष रमेश कांबळे, शाहीर शिवाजी कांबळे, कुंभी कारखान्याचे नूतन संचालक कृष्णात कांबळे, दिगंबर कांबळे उपस्थित होते. विलास भास्कर यांनी स्वागत केले. कार्यकारणी अशी : तालुकाध्यक्ष भुजंगा कांबळे (वाकरे), उपाध्यक्ष श्रावण कांबळे (कळंबा), सचिव प्रकाश पां. कांबळे (देवाळे), खजानिस जालिंदर कांबळे (दिंडनेर्ली), कार्याध्यक्ष दीपक कांबळे (केर्ली), संघटक प्रकाश गणपती कांबळे (देवाळे), तालुका संपर्क प्रमुख सुनील कांबळे (शिंगणापूर). सदस्यपदी दिलीप कांबळे (भामटे), धोंडिराम खांडेकर (बीड), महादेव खांडेकर (बीड), प्रवीण कांबळे (जैताळ), नंदकुमार कांबळे (जैताळ), अभिजित तेलवेकर (नागदेववाडी), विकास कांबळे (शिंगणापूर), सदानंद भास्कर (कुडित्रे), संभाजी कांबळे (नंदवाळ), लहू कांबळे (कळंबा), कबीर कांबळे (वाशी), ज्ञानेश्वर कांबळे (गिरगाव), राहुल कांबळे (गिरगाव), सुनील माने (नंदवाळ).
.......

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com