महापालिकेच्या ताफ्यात दोन ई - व्हेईकल दाखल

महापालिकेच्या ताफ्यात दोन ई - व्हेईकल दाखल

लोगो ः महापालिकेतून
----------
ich272.jpg

इचलकरंजी ः शहरातील ई - कचरा संकलनासाठी दोन बँकांच्या सीएसआर फंडातून दोन ई - व्हेईकल महापालिकेच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत.

महापालिकेच्या ताफ्यात
दोन ई - व्हेईकल दाखल

इचलकरंजी, ता. २७ ः शहरातील ई - कचरा संकलनासाठी दोन ई - व्हेईकल महापालिकेच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. बँक ऑफ बडोदा आणि आयडीबीआय बँकेच्या सीएसआर सीएसआर फंडातून या दोन व्हेईकल (रिक्षा) उपलब्ध केल्या आहेत.
शासनाच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत ई - व्हेईकलचा वापर करणे, ई - कचऱ्याचे संकलन करणे तसेच ई व्हेईकलसाठी चार्जिंग पॉईंट सुरू करणे बाबतच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार इचलकरंजी महापालिकेस शहरातील ई - कचरा संकलीत करण्यासाठी दोन ई - व्हेईकल (रिक्षा) न आयुक्त सुधाकर देशमुख, उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आणि प्रभारी उपायुक्त केतन गुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत महानगर पालिका प्रशासनाकडे सुपुर्द केल्या. मुख्य लेखाधिकारी कलावती मिसाळ, नगरसचिव विजय राजापुरे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, नगर रचनाकार रणजित कोरे, विद्युत अभियंता संदीप जाधव, बँक ऑफ बडोदाचे प्रशांत आव्हाड, मोहसीन खान शेख, नितीन लिहिणे, शरद पाटील, तसेच आयडीबीआय बँकेचे उमेश चव्हाण, ललित राजपूत, शिवाजी कांबळे आदी उपस्थित होते.
-----------------
सावली दिव्यांग संस्थेचे मनपासमोर उपोषण

इचलकरंजी, ता. २७ ः चिकन विक्री दुकान बंद करावे, या मागणीसाठी सावली दिव्यांग संस्थेतर्फे आज महापालिकेसमोर उपोषण सुरु केले. राजकुमार गेजगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले. संबंधित चिकन विक्री दुकानाला महापालिकेचा परवाना नसून संस्थेच्या शेजारीच हे दुकान असल्यामुळे दिव्यांगांना दुर्गंधीचा त्रास होत आहे, अशी निवेदनात तक्रार केली आहे. संस्थेच्या कार्यालयाच्या जागेचीही महापालिका प्रशासनाने चौकशी सुरु केली आहे.
------------------

थकीत भाडे भरण्यास मार्च अखेर मुदतवाढ
इचलकरंजी मनपा प्रशासनाचा निर्णय ः दुकान गाळेधारकांना दिलासा
इचलकरंजी, ता.२७ ः थकीत भाडे भरण्यासाठी दुकान गाळेधारकांना ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबतचा आदेश आज आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिला. कर्मचारी संपाच्या कालावधीत याबाबतच्या कार्यवाहीत अडथळा निर्माण झाल्याचे समोर आले. त्यानुसार मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामुळे दुकानगाळेधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. वाढीव मुदतीत थकीत भाडे भरल्यास प्रशासनाकडून गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया थांबणार आहे.
महापालिका प्रशासनाकडून थकीत भाडे भरण्याबाबत गाळेधारकांना पर्याय उपलब्ध करुन दिला होता. मुदत संपल्यानंतर प्रत्येक तीन वर्षांनी २५ टक्के भाडेवाढ व ई- लिलाव प्रक्रियेत विशेष प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला होता. याचा लाभ घेण्यासाठी मुदत दिली होती. या कालावधीत तब्बल २७२ दुकान गाळेधारकांनी लाभ घेतला होता. त्याव्दारे महापालिकेच्या तिजोरीत सुमारे दोन कोटीहून अधिक थकीत भाडे जमा झाले होते. तर २५१ दुकान गाळे ताब्यात घेण्याबाबत महापालिका प्रशासनाकडून तयारी करण्यात आली होती. लवकरच याबाबत नवीन भाडेदर निश्चीत करुन त्या गाळ्यांचा ई- लिलाव करण्यात येणार आहे.
दरम्यान, जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी मनपा कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन सुरु केले होते. त्याचा फटका ब-याच गाळेधारकांना बसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे थकीत भाडे भरण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश आज आयुक्त देशमुख यांनी दिला. या कालावधीत यापूर्वीच्या अटी व शर्थीनुसार कार्यवाही करण्यात येणार असून पुढील ई - लिलाव प्रक्रियेत सहभागी झाल्यास विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. यामध्ये ई- लिलावात उच्चतम बोलीची रक्कम मुळ गाळेधारकांस भरण्यास प्रथम संधी दिली जाणार आहे. प्रशासनाच्या या पर्यायाला अनेक दुकान गाळेधारकांनी प्रतिसाद दिला आहे.
-----------------

इचलकरंजी मनपाचे नविन संकेतस्थळ सुरु
इचलकरंजी, ता. २७ ः इचलकरंजी महापालिकेकडून नविन संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. यापूर्वी नगरपालिकेच्या नावाने सुरु असलेले संकेतस्थळ लवकरच बंद करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. नवीन संकेतस्थळामुळे नागरिकांना ऑनलाईन संवाद साधणे सुलभ होणार आहे. यामध्ये विविध सेवांची माहिती, पायाभूत सुविधा आदी माहिती सहज उपलब्ध होणार आहे. घरफाळा, पाणीपट्टी भरण्यासह तक्रार नोंदणी, महापालिका संदर्भातील घडामोडी, शासनाचे उपक्रम याची माहिती या संकेतस्थळाच्या माध्यमातून मिळणार आहे. याबाबत आवश्यक माहिती अपडेट करण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. भविष्यात परिपूर्ण माहिती व सुलभ सेवा देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील राहणार असल्याचे आयुक्त देशमुख यांनी सांगीतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com