कंत्राटी कामगार प्रश्‍न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंत्राटी कामगार प्रश्‍न
कंत्राटी कामगार प्रश्‍न

कंत्राटी कामगार प्रश्‍न

sakal_logo
By

सावित्रीबाई फुले रूग्णालयातील
कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार थकीत
कोल्हापूर, ता. २७ ः सावित्रीबाई फुले रूग्णालयातील ४८ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा तीन महिन्यापासून पगार नाही. तसेच त्यांचा प्रॉव्हीडंट फंड, ईएसआयचे पैसे भरलेले नाहीत. त्याबाबत संबंधित एसपी एंटरप्रायझेसऐवजी नवीन कंपनी नेमावी, अशी मागणी कोल्हापूर जनरल कामगार युनियनने (लाल बावटा) आज महापालिका प्रशासनाकडे केली. त्यानुसार आठवड्यात संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे.
पगार तसेच इतर सुविधा दिल्या जात नसल्याबाबत यापूर्वी चंद्रकांत यादव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन दिले होते. त्याबाबत आज कर्मचाऱ्यांसह पुन्हा यादव यांची उपायुक्त रविकांत आडसूळ यांच्याशी बैठक झाली. तीन महिन्यापासून पगार व अन्य सुविधांबाबतची स्थिती जैसे थे आहे. संबंधित एस पी एंटरप्रायझेसला मुदतवाढ दिली जाऊ नये. नवीन कंपनी नेमावी, अशी ठाम भूमिका यादव यांनी मांडली. त्यानंतर उपायुक्त आडसूळ यांनी संयुक्त बैठक घेऊन उपस्थित केलेल्या प्रश्‍नांबाबत मार्ग काढला जाईल, असे सांगितले. या वेळी जॉन भोरे, सनी घुणकीकर, इंद्रजीत कांबळे, करण काटे, पूनम यादव, शोभा हाळवणकर, अश्‍विनी कांबळे, नम्रता धुमाळ आदी उपस्थित होते.