कलापुरातील विद्यार्थ्यांचा लंडनमध्ये रंगणार नाट्यप्रयोग

कलापुरातील विद्यार्थ्यांचा लंडनमध्ये रंगणार नाट्यप्रयोग

९१७४१
कलापुरातील विद्यार्थ्यांचा
लंडनमध्ये रंगणार नाट्यप्रयोग
तीन मेला युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टमध्ये प्रयोग
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ ः पुणे येथील अप्लाईड थिएटर इंडिया फाउंडेशन या संस्थेला लंडन येथील युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट लंडन या संस्थेचे नाट्य सादरीकरणासाठी निमंत्रण मिळाले आहे. त्याअंतर्गत येथील कोल्हापूर पब्लिक स्कूल या शाळेतील आठ विद्यार्थी फोरम थिएटर हा नाट्यप्रकार लंडनमध्ये सादर करणार आहेत.
फाऊंडेशनचे संचालक कौस्तुभ बंकापुरे यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘अप्लाईड थिएटर हा विषय भारतीय समाजामध्ये तुलनेने नवीन आहे. विविध एनजीओ, शाळा आणि संस्था यांच्यासोबत विविध सामाजिक विषयावर अप्लाईड थिएटरच्या मदतीने फाउंडेशन काम करीत आहे. या विषयाचे महत्व कळावे आणि याचा प्रचार आणि प्रसार विद्यार्थ्यांपासून व्हावा म्हणून हा आंतरराष्ट्रीय प्रकल्प फाउंडेशनने सुरू केला आहे. निवडक आठ विद्यार्थांचे प्रशिक्षण चालू असून ३ मे रोजी हे विद्यार्थी युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट लंडन येथे सादरीकरण करणार आहेत. त्याचबरोबर हे विद्यार्थी शेक्सपियर ग्लोब थिएटर, ब्रिटिश म्युझियम, नॅशनल आर्ट गॅलरी अशा विविध सांस्कृतिक ठिकाणांना भेटी देणार आहेत. त्यामधून त्यांना परदेशातील सांस्कृतिक आणि कलात्मक पद्धती लक्षात येतील तसेच या निमित्ताने एक वेगळा अनुभव विद्यार्थ्यांना मिळेल.‘‘
कोल्हापूर पब्लिक स्कूलच्या संस्थापिका शोभा तावडे म्हणाल्या, ‘‘शाळा नेहमीच मुलांना वेगळा अनुभव देण्यासाठी प्रयत्न करत असते. यामध्ये अभ्यासाबरोबरच क्रीडा, स्काऊट, परदेशी भाषा यासोबतच हा नाट्य उपक्रम फौंडेशनच्या मदतीने राबविला आहे. असा उपक्रम राबविणारी ही पहिलीच शाळा आहे आणि यापुढे देखील हा आंतरराष्ट्रीय प्रकल्प आम्ही करत राहू.‘‘
या नाट्यउ पक्रमामध्ये तन्वी पाटील, जान्हवी जोशी, श्रेया मोरे, मुग्धा पोतदार, काव्या शहा, धनश्री साठे, ओजस शिंपळे, सम्यक पाटील या विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यांना फाऊंडेशनचे कौस्तुभ बंकापुरे, युवराज केळुस्कर आणि मुख्याध्यापिका अंजली मेळवंकी यांचे मार्गदर्शन मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com