
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय निधी
शासकीय अभियांत्रिकी
कॉलेजसाठी खर्चाला मान्यता
चार वर्षात २२१ कोटी ४८ लाखांचा निधी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ ः येथे नवीन अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, येत्या चार वर्षात टप्प्याटप्प्याने २२१ कोटी ४८ लाखांच्या खर्चाला आज उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मान्यता दिली.
येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणाऱ्या या महाविद्यालयाची प्रवेश क्षमता ३०० विद्यार्थी असणार आहे. अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यासाठी टप्प्याटप्प्याने एकूण ६५ शिक्षकीय आणि ५० शिक्षकेतर अशी एकूण ११५ पदे मंजूर करण्यास मान्यता मिळाली आहे. महाविद्यालयाची सारी व्यवस्था पहिल्या टप्प्यात शासकीय तंत्रनिकेतनमध्ये असेल. नवीन बांधकामाबरोबरच पायाभूत सुविधा अत्याधुनिक सामुग्री, वेतन आदी खर्चासाठी टप्प्याटप्प्याने निधी दिला जाणार आहे. सुरवीतीच्या टप्प्यात ९१ कोटी ७० लाख, दुसऱ्या वर्षी ४६ कोटी आठ लाख, तिसऱ्या वर्षी ४६ कोटी ७९ लाख तर चौथ्या वर्षी ३६ कोटी ८८ लाखांचा निधी दिला जाणार आहे.