
आवश्यक- संक्षिप्त
91845
रज्जू कटारिया यांचा मुंबईत गौरव
कोल्हापूर ः मुंबई येथे जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशनतर्फे झालेल्या कार्यक्रमात येथील जैन सोशल ग्रुपच्या अध्यक्षा रज्जू कटारिया यांना बेस्ट प्रेसिडेंट पुरस्काराने गौरवण्यात आले. जैन अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य सुनील सिंघी, ललित शहा, सुनीत पारिख, दीपा पारिख आदी उपस्थित होते. रज्जू कटारिया यांनी वर्षभर केलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची दखल घेत त्यांचा हा गौरव झाला.
-----------
91844
डॉ. पाटील यांचा ओडिशा येथे सत्कार
कोल्हापूर ः ब्रह्मपुर, ओडिशा येथील परिषदेत येथील लक्ष्यकिरण लेसर सेंटरचे डॉ. उद्घव पाटील यांचा डॉ. पृथ्वीराज सिंग यांच्या हस्ते सत्कार झाला.
चेहरा आणि शरीरावरील काळ्या, लाल जन्मखुणा, मुलांमधील रक्तवाहिन्यांचे लाल हिमाजिओमा तसेच व्रण आणि गोंदणासाठी लेसर उपचार खूपच परिणामकारक आहेत, असे मत डॉ. पाटील यांनी या वेळी व्यक्त केले. सौंदर्यविषयक लेसर शस्त्रक्रियेत त्यांचा २२ वर्षांचा अनुभव असून दोन दिवसांच्या कार्यशाळेत त्यांची दोन व्याख्याने झाली. महाराजा कृष्णचंद्र वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या या परिषदेत साडेतीनशे सर्जन्स उपस्थित होते.