
पोलिस शिपाई पदासाठी परीक्षा बातमी
पोलिस शिपाई पदासाठी
रविवारी लेखी परीक्षा
कोल्हापूर, ता. २७ : पोलिस शिपाई भरतीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून भरती प्रक्रिया सुरू आहे. शारीरिक चाचणीनंतर आता लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. रविवारी (ता. २) या पदाची लेखी परीक्षा होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील २८६ उमेदवार पात्र ठरले आहेत, अशी माहिती पोलिस उपाधीक्षक (गृह) प्रिया पाटील यांनी दिली.
जिल्हा पोलिस दलातील शिपाई पदाच्या २४ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठी ३२३२ उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ३१३४ उमेदवार भरतीसाठी आले होते. १८२० उमेदवार शारीरिक क्षमता चाचणीसाठी हजर राहिले, तर प्रत्यक्षात १४५७ उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी झाली. उपलब्ध असलेल्या २४ जागांसाठी एकास दहा या प्रमाणात २८६ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा रविवारी कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये होणार आहे.