
ईपीएस प्रश्न
91847
ईपीएस ९५ पेन्शनचा प्रश्न
सोडवण्यासाठी आग्रहीः महाडिक
कोल्हापूर, ता. २७ ः देशातील सत्तावीस राज्यांमध्ये कार्यरत ईपीएस ९५ राष्ट्रीय संघर्ष समिती गेली सात वर्षे पेन्शनवाढीसाठी संघर्ष करत असून, ही वाढ मिळण्यासाठी आग्रही आहे. या मागणीसाठी आवश्यक पाठपुरावा नक्की करू, अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. समितीच्या वतीने त्यांना लेखी निवेदन दिल्यानंतर शिष्टमंडळाने वृद्धापकाळातही रस्त्यावर उतरून आंदोलनाची वेळ आल्याची भूमिका मांडली. यावेळी श्री. महाडिक यांनी शिष्टमंडळाशी संवाद साधला. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष बी. एस. किल्लेदार, शहराध्यक्ष लालासाहेब गायकवाड, आर. डी. पाटील, सुभाष सावंत, एन. एस. पाटील, प्रकाश भोसले, राजू परांडेकर, सुनील कदम, संदीप जोग, अमर पाटील-कसबेकर आदी उपस्थित होते. दरम्यान, समितीतर्फे याच मागणीचे निवेदन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने यांनाही दिले.