अडीच लाखाची फसवणूक बातमी

अडीच लाखाची फसवणूक बातमी

टंचही नाही काढला अन दागिणेही गायब

सराफाला अडीच लाखाचा गंडा, एकावर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ ः टंच काढून देतो असे सांगून घेऊन गेलेले सोने -चांदीचे दागिने परत केले नाहीत म्हणून एकावर अडीच लाखाची फसवणूक केल्याचा गुन्हा जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. राकेश रजनीकांत रणदिवे (रा. गंगावेश रोड) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबतची फिर्याद सरदार भिकाजी सासणे (वय ३१ रा. सरदार तालीम, शिवाजी पेठ) यां सराफ व्यावसायीकांनी पोलिसात दिली. त्यावरून ही कारवाई करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सरदार सासणे यांचे गुजरी येथे सोने चांदीचा टंच काढण्याचे दुकान आहे. त्यांच्याकडे राकेश रणदिवे हे टंच काढण्यासाठी वारवार येत असत. यामुळे या दोघांची ओळख निर्माण झाली हाती. याचाच गैरफायदा घेवून ३ मे ते ३ जून दरम्यान रमेश रणदिवे याने सरदार सासणे यां सराफांकडून १ तोळे सोने, २ किलो चांदीचे दागिने टंच काढण्यासाठी म्हणून घेवून गेले. मात्र, हे दागिने अद्यापही त्यानी परत केले नाहीत. यामुळे सासणे यांनी याबाबतचा तक्रार अर्ज जुना राजवाडा पोलिस ठाण्याकडे दिला होता. या अर्जाची चौकशी करुन राकेश रणदिवे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com