अपघात

अपघात

91854
भडगावजवळील अपघातातह सुरचंपूचा तरुण ठार
गडहिंग्लज, ता. २७ : गडहिंग्लज- बेरडवाडी रोडवर भडगावच्या चोथेवाडीच्या चौकात मोटार व मोटरसायकलच्या धडकेत हसुरचंपु (ता. गडहिंग्लज) येथील तरुण अभियंता ठार झाला. सौरभ सोमनाथ घेजी (वय २२) असे मृताचे नाव आहे. आज सायंकाळी ही घटना घडली.
याबाबतची माहिती अशी की, सौरभ हा अलीकडील काही वर्षांपूर्वीच सिव्हिल इंजिनिअरची पदविका घेऊन बाहेर पडला आहे. त्यानंतर तो पाच वर्षांपासून घर बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट घेत होता. हे काम करीतच तो इंजिनिअरची पदवी शिक्षणही घेत होता. हसुरवाडी परिसरात त्याचे साईट सुरू आहेत. आज सायंकाळी साईटवरून तो बेरडवाडीमार्गे मोटरसायकलने घरी जात होता. चोथेवाडी चौकात आले असता समोरून येणारा छोटा टेम्पो व त्याच्या मोटरसायकलमध्ये धडक झाली.  त्यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, त्याचे वडील सोमनाथ गोडसाखर कारखान्यात सेवेत आहेत. त्याच्या मागे आई, वडील, भाऊ, आजोबा, चुलते असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com