Fri, June 9, 2023

गिजवणेत महावीर जन्मकल्याण महोत्सव
गिजवणेत महावीर जन्मकल्याण महोत्सव
Published on : 28 March 2023, 12:38 pm
गिजवणेत महावीर जन्मकल्याण महोत्सव
गडहिंग्लज : गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथे शनिवारपासून (ता.१) श्री भगवान महावीर जन्म कल्याण महोत्सव होणार आहे. शनिवारी विविध स्पर्धा होणार आहेत. रविवारी (ता. २) सायंकाळी पाचला कार्यक्रमांचे सवाल होतील. सायंकाळी सातला गर्भसंस्कार विधी व आरती होणार आहे. सोमवारी (ता. ३) पहाटे पाचला मंगल निनाद, सकाळी सहाला ध्वजारोहण, सकाळी सव्वासातला पंचामृत महाभिषेक, आरती, नामकरण विधी होणार आहे. सकाळी साडेआठला भगवान महावीरांच्या प्रतिमेची गावातून मिरवणूक निघणार आहे. दुपारी साडेबाराला महाप्रसाद वितरण होईल. सायंकाळी चारला पंचामृत अभिषेक व आरती होणार आहे. सायंकाळी सातला सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.