गोविंदचे अधिकारी होण्याचे स्वप्न अधुरेच...

गोविंदचे अधिकारी होण्याचे स्वप्न अधुरेच...

91942
गोविंद पाटील


दृष्टीहिन गोविंदचे अधिकारी होण्याचे स्वप्न अधुरेच...
लेखनिक मिळेना; अभ्यास असूनही अनेक विद्यार्थ्यांपुढे अंधार
बी. डी. चेचर : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ : सर्वसामान्य मुलाप्रमाणे त्याचेही स्वप्न अधिकारी बनण्याचे. दिवसाचे बारा-बारा तास अभ्यासाशी दोस्ती करत स्वतःला अपडेट ठेवत त्याची तयारी चालली आहे. दृष्टी नसूनही जगातील सर्व घडामोडी तोंडपाठ. स्पर्धा परिक्षेत त्यांच्यासाठी काही जागा आरक्षितही केल्या आहेत. त्यामुळे अधिकारी होणारच, असा आत्मवश्‍वास. मात्र परिक्षेसाठी लेखनिकच उपलब्ध होत नाही आणि परिणामी अनेक दृष्टीहीन विद्यार्थ्यांचे स्वप्न अधुरेच राहते. त्याच तरूणांपैकी एक म्हणजे गोविंद मोहन पाटील.
गोविंद मुळचा सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळचा. सध्या कळंबा परिसरात राहतो. त्याचे गोखले महाविद्यालयात इतिहास विषयातून बी.ए. झाले. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर स्पर्धा परिक्षेच्या तयारीला सुरुवात केली. रात्र-दिवस अभ्यास करत कोणत्याही परिस्थितीत आपण अधिकारी व्हायचं, हे ठरवून कष्ट अभ्यास सुरुच ठेवला. परिक्षेचा क्रमांक मुंबई पुणे या ठिकाणी असल्याने रायटरला स्वतः पैसे खर्च करुन नेले. मात्र पुर्णवेळ आणि शैक्षणिक गुणवत्तेचा मिळत नसल्याने गोविंदाची दोन वेळा दोन-तीन मार्कात संधी हुकली. कष्ट करण्याची प्रचंड उर्मी आहे मात्र अनेक अंध मुलांना रायटर मिळत नसल्याने त्यांना पुन्हा पुन्हा परिक्षेला बसावे लागत आहे. याचा अर्थिक फटका बसतोच त्याशिवाय मानसिकही फटका बसतो आणि त्यामुळे बघितलेल्या स्वप्नावर पाणी सोडावे लागते. एका रायटरला काही मानधन द्यावे लागते. शिवाय बाकी खर्चही त्या अंध तरुणांनी करायचा असतो. जर शासनाने या विषयाकडे लक्ष दिले,तर महाराष्ट्रातील अंध तरुणांना रायटरचा प्रश्‍न सुटेल. याच बरोबर अंधाकडे समाजाचा पहाण्याचा दृष्टीकोन बदलेल.
गोविंद पाटील यांची घरची परिस्थिती तशी बेताचीच आहे. त्यांचे आई वडील शेती करतात. अंधाना खासगी कंपन्यात नोकरी मिळते पण कायम ठेवले जात नाही. म्हणूनच गोविंदची जिद्द रेल्वेत नोकरी करण्याची आहे. त्यासाठी तो धडपडत आहे. पण त्याच्या समोर रायटर कसा मिळवायचा, असा प्रश्न आहे. गोविंद सध्या श्री अंबाबाई मंदीर परिसरात कटलरी मटेरियल विक्रिचा व्यवसाय भर उन्हात करत आहे.
----------
कोट
आता दृष्टीहीन व्यक्तीही उच्चशिक्षण घेत आहेत. शिवाय त्यांना शासकीय नोकरीमध्ये आरक्षणही आहे. त्याआधारे अभ्यास करून अधिकारी व्हायचं, असे स्वप्न बरेचजण पाहतात. मात्र सध्या लेखनिक उपलब्ध नसल्याचे त्यांच्या स्वप्नांमध्ये अडथळा निर्माण होतो आहे.
- गोविंद पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com