Sun, May 28, 2023

सहाय्यक आयुक्तपदाचे कार्यभार
सहाय्यक आयुक्तपदाचे कार्यभार
Published on : 28 March 2023, 12:41 pm
सरनाईक, डॉ. पाटील यांच्याकडे
सहायक आयुक्तपदाचा कार्यभार
कोल्हापूर, ता. २८ ः महापालिकेतील सहायक आयुक्तपदाच्या दोन रिक्त जागांवर अद्याप नवीन नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मुख्य लेखापाल संजय सरनाईक व पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांच्याकडे आज सहायक आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला.
विनायक औंधकर यांची विटा नगरपरिषदेकडे, तर संदीप घार्गे यांची मुरगूड नगरपरिषदेकडे मुख्याधिकारी म्हणून बदली झाली. त्यानंतर महापालिकेतील दोन्ही सहायक आयुक्तपदे रिक्त होती. त्यातील एका पदावर केएमटीच्या अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक टीना गवळी यांची नेमणूक केली होती. प्रशासकांनी संजय सरनाईक यांची सहायक आयुक्त एक, तर डॉ. पाटील यांची सहायक आयुक्त दोनवर नियुक्ती केली आहे.