व्हर्टिकल गार्डन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्हर्टिकल गार्डन
व्हर्टिकल गार्डन

व्हर्टिकल गार्डन

sakal_logo
By

91993
कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने बिंदू चौकातील तटबंदीवर साकारल्या जात असलेल्या व्हर्टिकल गार्डनमध्ये रोपे लावण्यात आली आहेत. त्यावर दिव्यांचीही सोय केली आहे. त्यामुळे रात्रीही हे गार्डन उठून दिसणार आहे.

बिंदू चौकातील तटबंदीवरील
व्हर्टिकल गार्डनवर बसवली रोपे
परिसरातील धुलिकण कमी करण्यास होणार मदत
कोल्हापूर, ता. २८ : राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत महापालिकेच्यावतीने बिंदू चौकातील तटबंदीवर उभारण्यात येत असलेल्या व्हर्टिकल गार्डनमध्ये विविध प्रजातींची वेगवेगळ्या आकारात रोपे लावली आहेत. अजून दहा टक्के काम व्हायचे असून या गार्डनमुळे परिसरातील धुलिकण कमी करण्यास मदत होणार आहे.
बिंदू चौकातील पर्यटकांची तसेच वाहनांची वर्दळ पाहून व्हर्टिकल गार्डन तयार करण्यात येत आहे. तटबंदीवर आठ फूट उंचीचे व ८० फूट लांबीचे गार्डन तयार केले आहे. उद्यान विभागातर्फे निविदा प्रक्रिया राबविली. डायमंड फायबर ॲण्ड फॅब्रिकेशन संस्थेस निविदा दिली असून ती प्राप्त आहे. या संस्थेस २४ लाख ९६ हजारात काम दिले. महापालिका पॅनेलवरील स्ट्रक्चरल ऑडीटर्सच्या मार्गदर्शनाखाली काम पुर्ण करण्यात आले. पीसीसी, कॉँक्रीटीकरण, प्लॅस्टरींग, गार्डन पॉट, कोकोपीठ मटेरीयल भरणे, ड्रीप इरीगेशन, ड्रेनेज व्यवस्था, विद्युत मोटर, ॲल्युमिनियम लॅडर बसविणे, स्ट्रक्चरल स्टील आदी कामांचा समावेश यात होता. बिंदू चौकातील प्रदूषण लक्षात घेवून त्या वातावरणात टिकतील अशा क्रिप्टॅन्थस, शफलेरा, जेड प्लांटस प्रजातीची रोपे लावली आहेत. तीन वर्षाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदारावर आहे. धुलीकण कमी करण्याबरोबरच आकर्षक एलईडी प्रकाश व्यवस्था केली असल्याने आकर्षकही दिसणार आहे.