दहा वर्षांत ‘सायन्स’चे २ लाख ५६ हजार पदवीधर

दहा वर्षांत ‘सायन्स’चे २ लाख ५६ हजार पदवीधर

दहा वर्षांत ‘सायन्स’चे अडिच लाख पदवीधर
विद्यार्थ्यांचा कल कायम; शिवाजी विद्यापीठातील चित्र

संतोष मिठारी ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ ः अन्य विद्याशाखांच्या तुलनेत जागतिक पातळीवर संशोधन, रोजगाराच्या अधिक संधी असल्याने विज्ञान व तंत्रज्ञान (सायन्स) विद्या शाखेतून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल कायम आहे. गेल्या दहा वर्षांत शिवाजी विद्यापीठातून २ लाख ५६ हजार ६०४ विद्यार्थी, विद्यार्थिनींनी ‘सायन्स’चे पदवी घेतली आहे. त्यापाठोपाठ मानव्यविद्या, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचा क्रम आहे.
विद्यापीठाच्या स्थापनेपासून १९६४ ते १९९८ या ३४ वर्षांमध्ये वाणिज्य, सामाजिकशास्त्र, कला या विद्याशाखेतून पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक होते. या विद्याशाखेनंतर विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचा क्रम होता. मात्र, सन २०००पासून विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेतील अभ्यासक्रमांना प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वर्षागणिक वाढत गेले. हे प्रमाण अद्याप कायम आहे. यंदा या विद्याशाखेतून पदवी घेणाऱ्या स्नातकांची संख्या २७ हजार ५५० इतकी आहे.

अधिक संधी असल्याने वाढते प्रमाण
विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेमध्ये कौशल्यपूर्ण आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांची असलेली अधिक संख्या, अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर संशोधन, उच्च शिक्षणाची संधी अधिक असल्याने या विद्याशाखेतून पदवीधर होण्याकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल आहे. त्याला विद्यापीठाने परदेशातील विद्यापीठ, शैक्षणिक संस्थांशी केलेले सामंजस्य कराराचे बळ मिळाले असल्याचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी सांगितले. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील पदवीधरांची संख्याही चांगली आहे. मानव्यविद्याशाखा आणि आंतरविद्याशाखेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी विविध नावीन्यपूर्ण आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
...
कोट
संशोधन, उच्च शिक्षण आणि रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होत असल्याने विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेकडील विद्यार्थ्यांचा कल वाढता आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार कौशल्य विकासावर आधारित नवीन अभ्यासक्रम विद्यापीठ सुरू करणार आहे.
-सरिता ठकार, अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान
.....
चौकट
अन्य विद्याशाखांमध्येही नव्या संधी
विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेत अकरावी ते पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंत प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण निश्‍चितपणे अधिक आहे. मात्र, या वाणिज्य व व्यवस्थापन, मानव्यविद्या, आंतरविद्याशाखा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरही रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. या संधींचा विद्यार्थी, पालकांनी विचार करणे यापुढील काळात महत्त्वाचे ठरणार असल्याचे डॉ. होमीभाभा राज्य विद्यापीठाच्या इनोव्हेशन, इनक्युबेशन विभागाचे संचालक डॉ. श्रीनिवास कुलकर्णी यांनी सांगितले.
......
चौकट
दीक्षान्त समारंभ पदवी घेणारे विद्याशाखानिहाय विद्यार्थी (हजारात)
विद्याशाखा*२०१४*२०१५*२०१६*२०१७*२०१८*२०१९*२०२०*२०२१*२०२२*२०२३
विज्ञान व तंत्रज्ञान*१६९५९*१८६९३*२११०८*२२६४८*२४५४८*३३४५१*२९२३६*३५५९७*२६८१४*२७५५०
वाणिज्य व व्यवस्थापन*१२०३७*१२२२९*११३१०*१०५५३*११२३०*०*१४६४०*२१९२७*१९७२०*२११५५
मानव्यविद्या*१७१२३*१६५७१*१९८५१*१६७९७*१४०२३*१२०१३*१४६४५*१७८८३*१४०६४*१५५५३९
आंतरविद्याशाखा*०*०*०*०*६८७*१०४६*१६४६*२१५३*१७६२*२२१३
------
चौकट
चार्ट करणे
१९६४ ते१९९८ दरम्यानचे पदवीधर
वाणिज्य-१०६९४३
सामाजिकशास्त्र-९८०८०
कला-९३२२३
विज्ञान-६३२८३
शिक्षणशास्त्र-४०६८६
अभियांत्रिकी व तंत्रज्ञान-२८६५४
कायदा (लॉ)-११३०६
वैद्यकशास्त्र-१०१४६
आयुर्वेदिक व होमिओपॅथिक वैद्यकशास्त्र-३१३०
ललितकला-३२१
शेती व विज्ञान-१०३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com