पशुधनामुळे शेतीमध्ये समृध्दी

पशुधनामुळे शेतीमध्ये समृध्दी

ajr282.jpg

आजरा ः येथील पंचायत समितीमधील पशुसंवर्धन शिबिरात सहाय्यक गटविकास अधिकारी अविनाश पाटील यांनी मार्गदर्शन केले. पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ. पी. डी. ढेकळे आदी उपस्थित होते.
--------------
पशुधनामुळे शेतीमध्ये समृध्दी
अविनाश पाटील ः आजरा पंचायत समितीमध्ये पशुसंवर्धनविषयक शिबीर
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २९ ः चाळीस पन्नास वर्षापूर्वी शेतीमध्ये शेणखत, हिरवळीचे खत याचा मोठ्या प्रमाणात वापर होत होता. ग्रामीण भागात संयुक्त कुटुंबे असल्यामुळे गायी, म्हैशी, शेळ्या, मेंढ्या अशी जनावरे होती. यामुळे शेणखत मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत होते. त्यामुळे शेतीमध्ये समृद्धी होती, असे प्रतिपादन सहाय्यक गटविकास अधिकारी अविनाश पाटील यांनी केले.
अनुसुचित जाती / नवबौद्ध लाभार्थी पशुसंवर्धनविषयक तीन दिवसांचे शिबीर झाले. अविनाश पाटील यांनी मार्गदर्शन केले. गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे यांच्याहस्ते शिबिराचे उद्‍घाटन झाले. आजरा तालुक्यातील विविध गावातील ३५ लाभार्थ्यांनी प्रशिक्षणामध्ये सहभाग घेतला. पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ. पी. डी. ढेकळे यांनी स्वागत केले. चित्रफितीद्वारे शेळीपालन, बाजारपेठ, लसीकरण कालावधी, जंत निर्मुलन महत्व, मावसल कोंबडी संगोपन व परसातील कुकुटपालन याविषयी लाभार्थ्यांना माहीती दिली. श्री. पाटील म्हणाले, ‘शेतीमध्ये विविध प्रयोग होत आहेत. शासनाकडून यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन दिले जात आहे. हे सर्व ठीक आहे. पण शेतीमध्ये सेंद्रीय कर्ब वाढवण्यासाठी व पोत सुधारण्यासाठी शेण खत, गांडुळ खत, हिरवळीची खते याचा वापर झाला पाहीजे. तरच उत्पादनात वाढ होवू शकते. यासाठी प्रत्येकाच्या घरात एक गाय असावी. पशुधनही असावे. यासाठी लाभार्थ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा.’ पशुधन पर्यवेक्षक डॉ. ए. के. पाटील, डॉ. डी. एन. पाटील, डॉ. संतोष कांबळे, डॉ. एस. बी. भिऊंगडे, डॉ. ए. एम. गोरुले, डॉ. डी. ए. मुल्लाणी, एस. एस. पारपोलकर, एच. डी. मोरे, पी. पी. भोये, ए. एस. उगले यांनी परीश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com