
एसआयआयएलसी
लोगो - 92045
दहा प्रकारचे मसाले
बनविण्याची जाणून घ्या कृती
कोल्हापुरात शनिवारी-रविवारी प्रात्यक्षिकावर आधारित प्रशिक्षण
कोल्हापूर, ता.२८ ः घरगुती मसाल्यांना बाजारपेठेत भरपूर मागणी आहे. विशेषतः महिलांना हा व्यवसाय घरगुतीस्तरावर सुरू करण्यासाठी चांगला वाव आहे. या व्यवसायात असलेल्या विविध संधी, मसाला व्यवसाय काळाची गरज का आहे, मसाला व्यवसायाचे पॅकिंग ब्रॅण्डिंग परवाने, व्यवसायाचे अर्थशास्त्र, व्यावसायिक पद्धती, व्यवसायासाठी लागणाऱ्या मशिनरी आदींविषयी सविस्तर मार्गदर्शन करणारे दोनदिवसीय विशेष प्रशिक्षण ता. १ आणि २ एप्रिल रोजी सकाळ ॲग्रोवन संलग्न शैक्षणिक संस्था एसआयआयएलसीतर्फे कोल्हापूर येथील सकाळ कार्यालयात होणार आहे.
यात सुमारे दहा प्रकारचे मसाले प्रात्यक्षिकासह बनवून दाखविले जाणार असून, त्यासंबंधी नोट्सही पुरवल्या जाणार आहेत. अन्नप्रक्रिया क्षेत्रातील अभ्यासू तज्ज्ञ या प्रशिक्षणाला मार्गदर्शन करणार आहेत. चहा, जेवण तसेच प्रमाणपत्रासह प्रतिव्यक्ती तीन हजार रुपये शुल्क आहे. अधिक माहिती व ऑनलाईन नावनोंदणीसाठी संपर्कः ९१७५७ २४३९९
चौकट
या दहा मसाल्यांविषयी मार्गदर्शनः
गरम मसाला, बिर्याणी मसाला
चिकन मसाला, मटण मसाला
चाट मसाला, मिसळ मसाला
चहा मसाला, गोडा मसाला
कोल्हापुरी कांदा लसूण चटणी
काळा मसाला,
हे लक्षात ठेवा
प्रशिक्षण तारीखः ता.१ आणि २ एप्रिल २०२३
कुठेः सकाळ कार्यालय, शिवाजी उद्ययमनगर, पार्वती चित्रमंदिराजवळ, कोल्हापूर
वेळः सकाळी १० ते संध्याकाळी ५
शुल्कः प्रतिव्यक्ती तीन हजार रुपये (चहा,जेवण, प्रमाणपत्रासह)
संपर्कः ९१७५७ २४३९९