भारत @ ७५ धेय्यासाठी प्रयत्नशिल रहा ः डॉ.रघुनाथ माशेलकर

भारत @ ७५ धेय्यासाठी प्रयत्नशिल रहा ः डॉ.रघुनाथ माशेलकर

९२०१८

समृद्ध भारत @ ७५ ध्येयासाठी प्रयत्नशील राहा
डॉ. रघुनाथ माशेलकर; एमकेसीएल, सह्याद्री प्रकाशनातर्फे प्रकट मुलाखत

कोल्हापूर, ता. २८ ः विषमतामुक्त, समृद्ध, सुरक्षित आणि स्वानंदी भारताच्या निर्मितीसाठी भारत @ ७५ या ध्येयाकडे पाहिले पाहिजे. असा भारत घडवण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या प्रकट मुलाखतीमध्ये ते बोलत होते.
एमकेसीएल, सह्याद्री प्रकाशन यांच्यावतीने सोहळ्याचे आयोजन केले होते. जडण-घडण नियतकालिकाचे संपादक डॉ. सागर देशपांडे यांनी डॉ. माशेलकर यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यांनी ‘दुर्दम्य आशावादी डॉ. रघुनाथ माशेलकर’ हे पुस्तक लिहिले आहे. या पार्श्वभूमीवर ही मुलाखत झाली. डॉ. माशेलकर यांचा शिक्षणासाठीचा संघर्ष त्यांनी सांगितला. शिक्षणातून भविष्य उज्‍ज्वल करता येते असे त्यांनी सांगितले. लक्ष्मीकडे जाण्याचा मार्ग सरस्वतीकडूनच जातो. श्रद्धा असली पाहिजे. पण, वैज्ञानिक दृष्टिकोनही स्वीकारला पाहिजे. हळदीच्या पेटंटमुळे पारंपरिक ज्ञानाला संशोधनाचा दर्जा जगभर कसा मिळाला, याची कहाणीही त्यांनी सांगितली. कोरोनाचा काळ हे ‘सायंटीस्ट इयर’ होते. या काळात आपण आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रात नेत्रदीपक संशोधन केले. आपल्या देशातील संशोधकांचा अभिमान वाटावा इतक्या गोष्टी आपण बनवल्या आणि जगाला दिल्या, असे डॉ. माशेलकर यांनी सांगितले. एमकेसीएलचे चीफ मेंटॉर विवेक सावंत, वैशाली माशेलकर, वीणा कामत, स्मिता देशपांडे यांची विशेष उपस्थिती होती.

चौकट
तंत्रज्ञान दिनाची केली विनंती
डॉ.माशेलकर म्हणाले, ‘११ मे १९९८ या एकाच दिवसात आपण अणुस्फोट चाचणी घेतली, मिसाईल आणि हंस एअरक्राफ्ट लाँच केले. एकाच दिवसात या तीन गोष्टी आपण केल्या म्हणून या दिवसाला तंत्रज्ञान दिन घोषित करावे, अशी विनंती मी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना केली होती. त्यांनी जाहीर कार्यक्रमातच याची घोषणा करून टाकली.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com